स्टेलॉनच्या मुलींना मिळणार ‘ग्लोब’ अवॉर्ड

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2016 09:45 PM2016-11-13T21:45:44+5:302016-11-13T21:49:47+5:30

स्टार सिलवेस्टर स्टेलॉन आणि जेनिफर फ्लेविन यांना तीन मुली असून, तिघींचीही मिस गोल्डन ग्लोब २०१७ या अ‍ॅवॉर्डसाठी निवड करण्यात ...

Stallone's girls get 'Globe' Award | स्टेलॉनच्या मुलींना मिळणार ‘ग्लोब’ अवॉर्ड

स्टेलॉनच्या मुलींना मिळणार ‘ग्लोब’ अवॉर्ड

googlenewsNext
टार सिलवेस्टर स्टेलॉन आणि जेनिफर फ्लेविन यांना तीन मुली असून, तिघींचीही मिस गोल्डन ग्लोब २०१७ या अ‍ॅवॉर्डसाठी निवड करण्यात आली आहे. एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, प्रेस असोसिएशनने गेल्या गुरुवारी खुलासा केला की, सोफिया, सिस्टिने आणि स्कारलेट स्टेलॉन ७४ व्या वार्षिक गोल्डन ग्लोब अवॉर्ड शोमध्ये मिस गोल्डन ग्लोब म्हणून सहभागी होणार आहेत. 
तीन मुलींची मिस ग्लोडन ग्लोब अवॉर्डसाठी निवड होण्याचा हा पहिलाच प्रसंग असल्याने स्टेलॉन आणि जेनिफर मुलींच्या निवडीबद्दल खुपच उत्साही आहेत. या शोसाठी हॉलिवूडमधील कोणत्याही स्टार्सच्या मुलांची या अ‍ॅवॉर्डसाठी निवड केली जाते, मात्र एकाच वेळी तीन स्टार्स किड्सची निवड होणे हे पहिल्यांदाच घडले आहे. त्यामुळे स्टेलॉन मुलींवर गर्व व्यक्त करीत आहे. 
एचएफपीएचे प्रमुख लोरेंजो सोरिया यांनी सांगितले की, ग्लोडन ग्लोबच्या इतिहासात पहिल्यांदाच आम्ही एक नव्हे तर तीन तीन मिस ग्लोडन ग्लोबसाठी निवड केली आहे. निश्चितच हा इतिहास असून, या अ‍ॅवॉर्डची व्याप्ती वाढत असल्याचे हे संकेत आहेत. कदाचित भविष्यात यापेक्षाही वेगळ्या निवड आपल्याला बघावयास मिळतील असेही त्यांनी सांगितले. 


 

Web Title: Stallone's girls get 'Globe' Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.