हॉलिवूडमध्ये दिसणार ‘चेंग यिंग’ ची कथा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2016 04:12 PM2016-10-21T16:12:23+5:302016-10-21T16:12:23+5:30

लॉस एंजेलिस येथील हॉलिवूड डॉल्बी थिएटरमध्ये गेल्या मंगळवारच्या रात्री चीनच्या संगीत नाट्य समूहाने हेनान यू ओपेराच्या माध्यमातून ‘चेंग यिंग ...

The story of 'Cheng Ying' will be seen in Hollywood | हॉलिवूडमध्ये दिसणार ‘चेंग यिंग’ ची कथा

हॉलिवूडमध्ये दिसणार ‘चेंग यिंग’ ची कथा

googlenewsNext
स एंजेलिस येथील हॉलिवूड डॉल्बी थिएटरमध्ये गेल्या मंगळवारच्या रात्री चीनच्या संगीत नाट्य समूहाने हेनान यू ओपेराच्या माध्यमातून ‘चेंग यिंग रेसक्यूस द आॅरफॅन’ चे सादरीकरण केले. 
गेल्या २,५०० वर्षांपासून विविध कलांसाठी प्रचलित असलेल्या संगीत नाट्यात चेंग यिंग यांची कथा सांगितली जाते. चेंग हा एक शाही चिकीत्सक होता. जो एका महान परिवारात जन्मलेल्या मुलाचे प्राण वाचवितो. त्यानंतर त्याला काही नाटकीय घटनांचा सामना करावा लागतो, हीच कथा या संगीत नाटकातून दाखविण्यात येते. 
नाटकाला चीनचे प्रसिद्ध हेनान यू ओपेरा नंबर २ द्वारा संगीत दिले गेले आहे. या नाटकाचे २००२ मध्ये प्रथम सादरीकरण करण्यात आले. त्यानंतर २२ देशांमध्ये तब्बल १,४०० वेळा हे नाटक दाखविण्यात आले आहे. अर्थात यामध्ये काळानुरूप बदलही करण्यात आले आहेत. चीनचा आघाडीचा कलाकार ली शुजियान याच्या नेतृत्त्वात हे नाटक २०१३ मध्ये न्यूयॉर्कच्या ब्रॉडवे थिएटरमध्ये दाखविण्यात आले होते. केवळ मेट्रोसिटीच नव्हे तर गावागावात या नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. चेंग यांची गाथा ही जगातल्या कानाकोपºयात पोहचावी हा यामागील उद्देश असल्याचे आयोजकांतर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. 

Web Title: The story of 'Cheng Ying' will be seen in Hollywood

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.