​‘सुटस्’ स्टार पॅट्रिक जे. अ‍ॅडम्सचे झाले लग्न!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2016 01:43 PM2016-12-14T13:43:32+5:302016-12-14T13:44:23+5:30

पॅट्रिक जे. अ‍ॅडम्सने ‘प्रिटी लिटल लायर्स’ स्टार ट्रॉईन बेलिसॅरिओशी सँटा बार्बरा येथे कॅम्पिंग थीम सोहळ्यात विवाह केला.

'Suite' star Patrick J. Adams married! | ​‘सुटस्’ स्टार पॅट्रिक जे. अ‍ॅडम्सचे झाले लग्न!

​‘सुटस्’ स्टार पॅट्रिक जे. अ‍ॅडम्सचे झाले लग्न!

googlenewsNext
गल ड्रामा सिरीयल ‘सुटस्’मधील माईकची भूमिका साकारणारा अभिनेता पॅट्रिक जे. अ‍ॅडम्सने गर्लफ्रेंड ट्राईन बेलिसॅरोशी विवाह केला. तीन वर्षे डेटिंग केल्यानंतर त्यांनी दोन वर्षांपूर्वी एंगेजमेंट केली होती. कॅलिफोर्नियातील सँटा बार्बरा येथे दोघांनी कॅम्पिंग थीम सोहळ्यात २०० पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केले.

‘प्रिटी लिटल लायर्स’ मालिकेतील अभिनेत्री ट्रॉईनशी पॅट्रिक अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोकळ्या वातावरणात तीन दिवस चाललेल्या विवाहसोहळ्यात त्यांच्या अनेक सहकलाकारांनीसुद्धा हजेरी लावली होती. विशेष म्हणजे सर्व पाहुणे मंडळींना एका बसमध्ये बसवून पॅट्रिकने स्वत: ती बस चालवत विवाहस्थळी नेली. या बसच्या पाठीमागे ‘अलमोस्ट मॅरिड’अशी पाटी होती.

यावेळी नववधूने कॉर्टना गाऊन तर पॅट्रिकने थ्री-पीस राल्फ लॉरेन सुट परिधाने केला होता. प्रसिद्ध निर्माते आणि वधूचे पिता डोनल्ड बेलिसॅरिओंनी मुलीला लग्नसंमारंभात आणले तेव्हा तिच्या डोक्यावर गोल्डन मुकूट होता. सोहळ्याचे खूप फोटोज् सध्या सोशल मीडियावर शेअर केले जात आहेत.
 


विशेष अतिथींमध्ये ‘सुटस्’ स्टार सॅराह रॅफर्टी, ‘स्टार ट्रेक’चा क्रिस पाईन, झॅकरी क्विंटो आणि ‘स्कँडल’ स्टार केटी लोव्हज व तिचा पती अ‍ॅडम शॅपिरो यांचा समावेश होता. ट्रॉईनची को-स्टार शे मिशेल मात्र यावेळी हजर राहू नाही शकली. पाठवलेल्या एका व्हिडिओ संदेशामध्ये तिने तिची माफी मागितली.
 

पॅट्रिकची को-स्टार मेघन मार्केलसुद्धा विवाहसाठी अनुपस्थित होती. इंग्लंडचा राजपुत्र प्रिन्स हॅरीसोबत सुरू असणाºया प्रेमसंबंधामुळे सध्या प्रचंड चर्चेत असलेल्या मेघनने नवदाम्पत्यावरून लक्ष विचलित होऊ नये म्हणून जातीने गैरहजर राहण्याचा निर्णय घेतला.

Web Title: 'Suite' star Patrick J. Adams married!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.