४ तासांच्या चौकशीनंतर मुनमुन दत्ताला मिळाला जामीन? अखेर चर्चांवर बबिताने सोडलं मौन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2022 05:02 PM2022-02-08T17:02:53+5:302022-02-08T17:03:40+5:30

Munmun dutta:गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर तारक मेहता का उल्टा चष्माफेम मुनमुन दत्ता हिच्या अटकेविषयी जोरदार चर्चा सुरु आहे.

tarak mehta ka ooltah chashma fame munmun dutta aka babita ji clears air on arrest news | ४ तासांच्या चौकशीनंतर मुनमुन दत्ताला मिळाला जामीन? अखेर चर्चांवर बबिताने सोडलं मौन

४ तासांच्या चौकशीनंतर मुनमुन दत्ताला मिळाला जामीन? अखेर चर्चांवर बबिताने सोडलं मौन

googlenewsNext

गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर 'तारक मेहता का उल्टा चष्मा'फेम (tarak mehta ka ooltah chashma)  मुनमुन दत्ता (munmun dutta) हिच्या अटकेविषयी जोरदार चर्चा सुरु आहे. एका विशिष्ट समाजावर टिप्पणी केल्याप्रकरणी तिला अटक करण्यात आल्याचं म्हटलं जात होतं. इतंकच नाही तर चार तासांच्या चौकशीनंतर तिची अंतरिम जामीनावर सुटका करण्यात आल्याचंही म्हटलं जात होतं. परंतु, या सगळ्या चर्चांवर मुनमुन दत्ताने स्पष्टीकरण दिलं आहे. इतंकच नाही तर अटकेचं वृत्तही तिने फेटाळून लावलं आहे. एका मुलाखतीत नेमकं काय प्रकरण आहे हे तिने सांगितलं आहे.

मुनमुनच्या अटकेमागे नेमकं काय आहे सत्य?

गेल्या काही काळापासून सोशल मीडियावर मुनमुन दत्ताला अटक झाली अशी जोरदार चर्चा सुरु आहे. या चर्चांवर अखेर मुनमुने मौन सोडलं आहे. एका मुलाखतीत तिने सत्य सांगितलं आहे. "मला अटक करण्यात आली नव्हती. केवळ नॉर्मल चौकशीसाठी मला बोलावण्यात आलं होतं. शुक्रवारी मला अंतरिम जामीन मंजूर झाला. पण, त्यावेळी मला केवळ सर्वसाधारण चौकशीसाठी पोलिसांसोबत जावं लागलं होतं."

चौकशीसाठी गेले होते पोलिस ठाण्यात

"मला अटक झालीच नव्हती. उलट मी शुक्रवारी ज्यावेळी कोर्टात गेले होते त्यावेळी चौकशीसाठी जाण्यापूर्वीच मला अंतरिम जामीन मंजूर झाला होता. हंसी पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी जवळपास अडीच तास माझी चौकशी केली आणि या प्रकरणाशी संबंधित माहिती माझ्याकडून घेतली. यावेळी पोलीस चौकीमध्ये प्रत्येक जण माझ्याशी नम्रपणे आणि व्यवस्थित वागले."
 
चर्चा होण्यासाठी काही जणांनी पसरवली अफवा

चौकशीदरम्यान, "मी पोलिसांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर दिलं आणि यापुढेही त्यांच्या तपासात त्यांना लागेल त्या गोष्टींसाठी मदत करेन. पण, या प्रकरणी ज्या प्रकारे चर्चा झाली ते पाहून मला खरंच वाईट वाटलं. अनेकांनी चुकीच्या हेडिंग्सने बातम्या केल्या. क्लिकबेट हेडिंग आणि फोटोचा वापर करुन अफवा पसरवली याचं मला खरंच वाईट वाटलं."

नेमकं काय आहे प्रकरण? 

९ जानेवारी २०२१ मध्ये मुनमुनने युट्यूबवर एक व्हिडीओ शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये तिने अनुसूचित जातींविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी हरियाणातील हांसी येथील दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी मुनमुनविरोधात हांसी पोलीस ठाण्यात एससी एसटी कायद्यांअंतर्गत तक्रार दाखल केली होती.

Web Title: tarak mehta ka ooltah chashma fame munmun dutta aka babita ji clears air on arrest news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.