हॉलिवूड अभिनेता बेन अॅफ्लेकच्या दहा वर्षीय मुलाने 3 कोटींची लॅम्बोर्गिनी ठोकली

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 09:58 PM2022-06-27T21:58:52+5:302022-06-27T22:02:51+5:30

बॅटमॅन हे लोकप्रिय पात्र साकारणारा हॉलिवूड स्टार बेन अॅफ्लेकच्या बीएमडब्ल्यू गाडीवर 3 कोटींची लॅम्बोर्गिनी ठोकली आहे.

ten-year-old son of Hollywood actor Ben Affleck hit a Lamborghini worth Rs 3 crore | हॉलिवूड अभिनेता बेन अॅफ्लेकच्या दहा वर्षीय मुलाने 3 कोटींची लॅम्बोर्गिनी ठोकली

हॉलिवूड अभिनेता बेन अॅफ्लेकच्या दहा वर्षीय मुलाने 3 कोटींची लॅम्बोर्गिनी ठोकली

googlenewsNext

हॉलिवूड स्टार बेन ऍफ्लेक(Ben Affleck)  आणि जेनिफर गार्नर (Jennifer Garner)  यांचा 10 वर्षांचा मुलगा सॅम्युअल गार्नर ऍफ्लेकचा मोठा अपघात झाला. बेन आणि त्याची गर्लफ्रेंड, गायक-अभिनेत्री जेनिफर लोपेझ(Jennifer Lopez)   फिरायला गेले होते. त्यांच्यासोबत सॅम्युअलदेखील होता. ते तिघे लॉस एंजेलिसमधील लॅम्बोर्गिनीच्या आउटलेटमध्ये गेले. रतिथे सॅम्युअलच्या हाताने कारचा अपघात झाला. रिपोर्टनुसार, कारची किंमत तब्बल 3 कोटी रुपये आहे.

न्यू यॉर्क पोस्टनुसार, बेन अॅफ्लेक आणि जेनिफर लोपेझ लॉस एंजेलिसमध्ये एका लक्झरी कार रेंटल डीलरशिपमध्ये होते. यावेळी बेन अॅफ्लेक एका डीलरशी बोलण्यात व्यस्त होता. यादरम्यान, सॅम्युअल लॅम्बोर्गिनी उरूसच्या ड्रायव्हर सीटवर बसला. यावेळी चुकीने गाडीचे रिव्हर्स गेअर टाकण्यात आले आणि गाडी उभ्या असलेल्या पांढऱ्या रंगाच्या बीएमडब्ल्यूला धडकली.

सॅम्युअल हा बेन ऍफ्लेक आणि अभिनेत्री जेनिफर गार्नरचा धाकटा मुलगा आहे. सॅम्युअलला दोन मोठ्या बहिणी आहेत, व्हायोलेट ऍनी आणि सेराफिना रोज एलिझाबेथ. बेन आणि जेनिफरचे 2005 मध्ये लग्न झाले होते. 2018 मध्ये दोघेही वेगळे झाले. बेनने नुकतेच जेनिफर लोपेझसोबत नाते सुरू केले. दोघांनी पहिल्यांदा 2002-04 मध्ये एकमेकांना डेट केले होते. त्यांची एंगेजमेंटही झाली होती, पण नंतर पुन्हा संबंध संपुष्टात आले. दोघांनी एप्रिल 2021 मध्ये पुन्हा डेटिंग सुरू केली आणि दोन महिन्यांपूर्वी लग्न केले.

Web Title: ten-year-old son of Hollywood actor Ben Affleck hit a Lamborghini worth Rs 3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.