पिटने मुलांसोबत साजरा केला नाही ‘थॅक्सगिव्हिंग डे’

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2016 08:46 PM2016-11-25T20:46:59+5:302016-11-25T20:52:25+5:30

हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पिट मुले आणि अ‍ॅँजेलिनासोबत ‘थॅँक्सगिविंग डे’ साजरा केला नाही.  एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅँजेलिनाने ब्रॅड पिट ...

Thaksgiving Day not celebrated with children; | पिटने मुलांसोबत साजरा केला नाही ‘थॅक्सगिव्हिंग डे’

पिटने मुलांसोबत साजरा केला नाही ‘थॅक्सगिव्हिंग डे’

googlenewsNext
लिवूड अभिनेता ब्रॅड पिट मुले आणि अ‍ॅँजेलिनासोबत ‘थॅँक्सगिविंग डे’ साजरा केला नाही. 
एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार अ‍ॅँजेलिनाने ब्रॅड पिट याला मुलांसोबत या डेमध्ये सहभागी होण्यासाठी निमंत्रणच दिलेले नव्हते. अ‍ॅँजेलिना आणि पिट दरवर्षी मुले मॅडॉक्स, पॅक्स, जाहरा, शिलोह आणि जुळवा मुले नॉक्स व विवियन यांच्यासोबत ‘थॅँक्सगिविंग डे’ उत्साहात साजरा करीत होते. परंतु अ‍ॅँजेलिनाने पिटसोबत घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्याने ती मुलांना देखील त्याच्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे. 

खरं तर गेल्या बुधवारी आलेल्या वृत्तानुसार पिट संपूर्ण परिवारासह थॅँक्सगिविंग डे साजरा करणार होता. मात्र आता आलेल्या माहितीनुसार पिटला निमंत्रणच मिळाले नसल्याने तो या डेमध्ये सहभागी झाला नाही. 

त्याचबरोबर मोठा मुलगा मॅडॉक्स याच्याबरोबर झालेल्या वादामुळे देखील त्याला या डेमध्ये सहभागी होता आले नसल्याचे सांगण्यात आले. गेल्या सप्टेंबर महिन्यात फ्रांसमधून अमेरिकेला परतताना ब्रॅड पिटने मारहाण केल्याची तक्रार मॅडॉक्स दिली होती. 

असे म्हटले जात आहे की, या वादामुळेही अ‍ॅँजेलिनाने पिटबरोबर घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे. अ‍ॅँजेलिनाने घटस्फोटाचा अर्ज दाखल केल्यापासून आतापर्यंत केवळ तीनच वेळा पिट मुलांना भेटला आहे. मात्र या भेटीत मॅडोक्सने पिटबरोबर संवाद साधला नाही. त्याने त्याच्यासमोर जाणे टाळले. आजही तो पिटचा प्रचंड तिरस्कार करीत असून, त्याच्या सांगण्यानुसारच अ‍ॅँजेलिनाने ब्रॅड पिटला या डेचे निमंत्रण दिले नसल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान पिटकडून यावर अद्यापपर्यंत कुठलीही प्रतिक्रिया दिली गेली नाही. 

Web Title: Thaksgiving Day not celebrated with children;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.