The Elephant Whisperer Won Oscar Award 2023: ऑस्कर जिंकणाऱ्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ची कथा आहे तरी काय? 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:08 AM2023-03-13T11:08:10+5:302023-03-13T11:12:13+5:30

The Elephant Whisperer Won Oscar Award 2023: ‘नाटू नाटू’ने ऑस्कर जिंकलाच. शिवाय ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने देखील बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावत भारतीयांचा आनंद द्विगुणित केला.

The Elephant Whisperer Wins Oscar Award 2023 know the story | The Elephant Whisperer Won Oscar Award 2023: ऑस्कर जिंकणाऱ्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ची कथा आहे तरी काय? 

The Elephant Whisperer Won Oscar Award 2023: ऑस्कर जिंकणाऱ्या ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ची कथा आहे तरी काय? 

googlenewsNext

The Elephant Whisperer Won Oscar Award 2023:  आज रंगलेल्या ऑस्कर सोहळ्याकडे सर्व भारतीयांच्या नजरा लागल्या होत्या.  ‘नाटू नाटू’ हे गाणं ऑस्कर जिंकून आणले, हा आत्मविश्वास प्रत्येक भारतीयाला होता.  पण याशिवाय भारताला आणखी एक नॉमिनेशन मिळालं होतं. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ हा लघुपटही ऑस्करच्या शर्यतीत होता. ‘नाटू नाटू’ने ऑस्कर जिंकलाच. शिवाय ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ने देखील बेस्ट डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मचा ऑस्कर पुरस्कार पटकावत भारतीयांचा आनंद द्विगुणित केला.
ऑस्करवर नाव कोरणाऱ्या याच ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या लघुपटाबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तर  41 मिनिटांचा हा लघुपट हत्ती आणि त्याला सांभाळणाऱ्या दांपत्याच्या आयुष्यावर  बेतलेला आहे.

काय आहे ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ची कथा...
कथा आहे एका जोडप्याची. हत्तीची पिल्लांना सांभाळणाऱ्या जोडप्याची संवेदनशील कथा या लघुपटात पाहायला मिळते. सत्यघटनेवर आधारित हा लघुपट गुनीत मोंगा यांनी प्रोड्यूस केला आहे तर कार्तिकी गोंसाल्विसने दिग्दर्शित केला आहे. दक्षिण भारतातील एक जोडपं बोम्मन आणि बेल्ली हे दोघं रघू आणि अम्मू नावाच्या दोन हत्तीच्या पिल्लांना दत्तक घेतात आणि अगदी आपल्या बाळासारखं त्यांना जपतात.

 

बोम्मन, बेली दोघं जंगलात राहणारे दरिद्री, निरक्षर माणसं. पण असं असूनही निसर्गावर त्यांचं अपार प्रेम. बोम्मन वनखात्यासाठी काम करत असताना रघू हे हत्तीचं बाळ त्याच्याकडे येतं.  त्याच्या शेपटीचे कुत्र्यांनी लचक तोडलेले असतात. आईचा मृत्यू झाला असतो. या रघूला बोम्मन आणि बेली अगदी तळहातावरच्या फोडासारखं जपतात.  रघुसाठी बांबूच्या फांद्या तोडण्यापासून, ता त्याला दुध पाजेपर्यंत सगळं दोघंही अतीव प्रेमाने करतात. जणू ते आपलं स्वत:चं बाळ आहे, या जबाबदारीने डोळ्यांत तेल घालून दोघंही रघूचं संरक्षण करतात. आईबाबा आपल्या अजान बाळाशी बोलतात, तसेच दोघंही रघुसोबत गप्पा मारतात. कधी ''दुध नीट पी रे, ती नळी खाऊ नको'', म्हणून दटावणारी आई बेल्ली तर कधी आता तुला भरपूर गवत मिळणार हो, रघू असं  म्हणणारा बाबा... या दोघांच्या प्रेमळ सहवासात रघू अगदीच रमून जातो. रघुनंतर या दोघांकडे अम्मू नावाचं आणखी एक हत्तीचं बाळ येतं. अम्मू रघूपेक्षाही लहान असतो. बोम्मन आणि बेल्ली त्यालाही मायेनं जपतात.  रघु त्याला अनेक गोष्टी शिकवतो.  दरम्यान रघुची काळजी घेता घेता बोम्मन बेल्ली एकमेकांची काळजीही घ्यायला लागतात.  रघु थोडा मोठा झाल्यावर वनखातं त्याला दुसऱ्याा केअरटेकरकडे सोपवतात. तो क्षण डोळ्यांत पाणी आणतो.

या लघुपटाची कथा खरं तर वाचून कळण्यासारखी नाहीच. ती फक्त पाहून अनुभवता येण्यासारखीच आहे. डोळ्यांत आसवं आणणारी, बोम्मन आणि बेल्लीसारखी फक्त प्रेम करणारी माणसं अनुभवायची, तर तुम्हाला हा लघुपट एकदा तरी पाहावाच लागले. The Elephant Whisperers गेल्या ८ डिसेंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज झाली होती. नेटफ्लिक्स हा लघुपट तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

Web Title: The Elephant Whisperer Wins Oscar Award 2023 know the story

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.