‘टायटॅनिक’ फेम लिओनार्डोचं २३ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडबरोबर लिपलॉक, ‘ते’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2023 17:54 IST2023-09-07T17:54:08+5:302023-09-07T17:54:24+5:30
सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकैप्रियो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

‘टायटॅनिक’ फेम लिओनार्डोचं २३ वर्षांनी लहान गर्लफ्रेंडबरोबर लिपलॉक, ‘ते’ फोटो सोशल मीडियावर व्हायरल
सुप्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता लिओनार्डो डिकैप्रियो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. लिओनार्डो २३ वर्षांनी लहान असलेल्या मॉडेल विटोरिया सेरेटीबरोबर रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहेत. त्या दोघांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता लिओनार्डोचे गर्लफ्रेंडबरोबरचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.
काही दिवसांपूर्वी लिओनार्डो त्याची २५ वर्षीय गर्लफ्रेंड विटोरिया सेरेटीबरोबर स्पेनमधील नाइटक्लबमधील पार्टीत सामील झाला होता. यादरम्यानचे त्याचे काही फोटो आणि व्हिडिओ समोर आले आहेत. या फोटोंमध्ये लिओनार्डो गर्लफ्रेंडबरोबर पार्टीत डान्स करताना दिसत आहे. लिओनार्डो गर्लफ्रेंडबरोबर रोमँटिक झाल्याचंही फोटोत पाहायला मिळत आहे. याचदरम्यानचे त्यांचे लिपलॉक करतानाचे फोटोही व्हायरल झाले आहेत. गर्लफ्रेंडबरोबर नाइट क्लबमध्ये जाण्याआधी लिओनार्डोला अभिनेत्री अराबेलाबरोबरही स्पॉट करण्यात आलं होतं.
Vittoria Ceretti & Leonardo DiCaprio out in Ibiza 👀 pic.twitter.com/8zSyUgyR9s
— Victoria's Secret (@vsactu) September 6, 2023
लिओनार्डो हा हॉलिवूडमधील सुप्रसिद्ध अभिनेता आहे. त्याने टायटॅनिक, द रिवेनंट, द एविएटर, इन्सेप्शन, गँग्स ऑफ न्यूयॉर्क अशा अनेक सुपरहिट चित्रपटांत काम केलं आहे. ४८ वर्षीय लिओनार्डोने अनेक हॉलिवूड अभिनेत्रींना डेट केलं आहे. त्याचं नाव भारतीय मॉडेल नीलम गिलबरोबरही जोडलं गेलं होतं. त्या दोघांच्या डेटिंगच्या चर्चा रंगल्या होत्या.