गरीब कुटुंबात लहानाचा मोठा झालेला हा अभिनेता, आज आहे हॉलिवूडचा स्टार
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2019 06:00 AM2019-07-08T06:00:00+5:302019-07-08T06:00:00+5:30
या हॉलिवूड स्टारचे बालपण खूप हलाखीत गेलं होतं.
टॉप गन, मिशन इम्पॉसिबल सीरिज आणि अमेरिकन मेड यांसारख्या सिनेमात झळकलेला हॉलिवूडचा सुपरस्टार टॉम क्रुझ आजही लाखों तरूणींच्या मनावर अधिराज्य गाजवतो आहे. एका सामान्य कुटुंबात टॉम क्रुझचा जन्म झाला आणि त्याचे बालपण अजिबात सामान्य गेलं नाही.
सीबीएस न्यूजला दिलेल्या मुलाखतीत टॉम क्रुझने खुलासा केला होता की, त्याच्या बालपणी त्याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती अजिबात चांगली नव्हती. त्याचे वडील त्याला नेहमी मारायचे. वडिलांकडून त्याला खूप काही शिकायला मिळालं. वयाच्या अकराव्या वर्षी त्याचे वडील त्याच्या आईपासून वेगळे झाले होते.
घराचा व स्वतःचा खर्च काढण्यासाठी टॉम क्रुझ लोकांच्या लॉनची कापणी व छाटणी करायचा. टॉम कॅथलिक कुटुंबात लहानाचा मोठा झाला असल्यामुळे त्याला वयाच्या १४ व्या वर्षी फादर (कॅथलिक पादरी) बनायचे होते. मात्र एक दिवस फादरच्या रुममधून दारूची चोरी करताना त्याला पकडले होते. त्यानंतर त्याला फ्रान्सिस्कन सेमिनॅरी स्कूलमधून बाहेरचा रस्ता दाखवला होता आणि त्याचे फादर बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं.
एक दिवस टॉमच्या शिक्षकाने त्याला अॅक्टिंग क्लास जॉईन करायला सांगितलं. टॉमने अॅक्टिंगचे ट्रेनिंग घ्यायला सुरूवात केली. अॅक्टिंगदरम्यान त्याला त्याच्या लाईन लक्षात ठेवणं कठीण जात होते. त्यानंतर त्याने विज्युएल लर्निंगच्या माध्यमातून लाइन्स लक्षात ठेवायला सुरूवात केली.
छोट्या मोठ्या भूमिका केल्यानंतर १९८३ साली त्याचा रिस्की बिझनेस चित्रपट प्रेक्षकांना खूप भावला. हा चित्रपट सुपरहिट ठरला.
त्यानंतर टॉम क्रुझचं स्टारडम सुरू झाले. आज टॉमची गिनती हॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्यांमध्ये होते.