प्रसिद्ध गायकाला १० वर्षांचा कारावास; २०२० मध्ये केला होता गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2023 17:15 IST2023-08-09T17:14:37+5:302023-08-09T17:15:59+5:30
Tory lanez: काइली जेनरच्या पूल पार्टीमध्ये त्याने गोळीबार केला होता.

प्रसिद्ध गायकाला १० वर्षांचा कारावास; २०२० मध्ये केला होता गोळीबार
प्रसिद्ध कॅनडियन रॅपर टोरी लानेझ याला २०२० मध्ये केलेल्या गोळीबाराप्रकरणी १० वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. टोरी लानेझ याने २०२० मध्ये हिपहॉप स्टार मेगन थी स्टॅलियनवर गोळीबार केला होता. त्यानंतर ७ महिन्यांनंतर निकाल आला. दोन दिवस चाललेल्या सुनावणीनंतर लॉस एंजेलिस सुपीरिअर कोर्टाच्या न्यायाधीशांनी टोरी याला १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे.
युएसए टुडेच्या रिपोर्टनुसार, डिसेंबर २०२० मध्ये काइली जेनर हिने एका पूल पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीमध्ये टोरी लेनेझ आणि मेगन थे स्टॅलियन यांच्यात वाद झाला. या वादामध्येच टोरीने मेगनच्या पायावर गोळी झाडली. परिणामी, तिला मोठी दुखापत झाली. मेगनच्या पायाला लागलेल्या गोळीमुळे तात्काळ तिची शस्त्रक्रिया करावी लागली. ज्यामुळे ४ दिवस तिला रुग्णालयात अॅडमिट रहावं लागलं होतं. इतकंच नाही तर या गोळीबारात तिचा पाय इतका जखमी झाला होता की तिला तिच्या पायांवर नीट उभंही राहता येत नव्हतं. परिणामी, फिजिओथेरपीच्या मदतीने तिच्या प्रकृतीमध्ये हळूहळू सुधारणा झाली.
Tory Lanez has officially been sentenced to 10 years in prison for shooting Megan Thee Stallion. pic.twitter.com/KoHITfMluB
— Pop Base (@PopBase) August 8, 2023
दरम्यान,शिक्षेच्या वेळी टोरी लानेझने त्याचा गुन्हा मान्य केला. मी मेगन थी स्टॅलियनवर हल्ला केला, असं त्याने कबुल केलं. फिर्यादी पक्षाने टोरीला १३ वर्षांची शिक्षा व्हावी अशी मागणी केली होती. परंतु, न्यायाधीशांनी निकालाअंती ही शिक्षा १० वर्षांची केली.