TRAVEL BAN: ‘लायन’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी डोनाल्ड ट्रम्पविरोधात छापली ‘जाहिरात’

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2017 09:16 AM2017-02-12T09:16:46+5:302017-02-12T14:49:34+5:30

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश देण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण जगाचा ...

TRAVEL BAN: Producer of 'Lion' printed 'advertisement' against Donald Trump | TRAVEL BAN: ‘लायन’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी डोनाल्ड ट्रम्पविरोधात छापली ‘जाहिरात’

TRAVEL BAN: ‘लायन’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी डोनाल्ड ट्रम्पविरोधात छापली ‘जाहिरात’

googlenewsNext
ेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांना अमेरिकेत प्रवेश देण्यास बंदी घालण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण जगाचा रोष ओढावून घेतला. वादग्रस्त ट्रम्प यांच्या कारभारावर सध्या अमेरिकेत मोठ्या प्रमाणात टीका होत असून लोक त्यांच्याविरोधात आवाज उठवत आहेत.

‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांमध्ये अभिनेत्री मेरिल स्ट्रीप यांनी ट्रम्पयांच्यावर टीका करणारे भाषण करून मनोरंजनविश्वाची त्यांच्याबद्दल असणारी नाराजी बोलून दाखविली होती. आता देव पटेल स्टारर ‘लायन’ चित्रपटाच्या निर्मात्यांनी ट्रम्प यांच्या ‘प्रवेश बंदी’च्या धोरणाला विरोध दर्शवणारी एक जाहिरात अमेरिकेतील एका आघाडीच्या वृत्तपत्रामध्ये छापून आणली.

ALSO READ: देव पटेलला काय वाटते अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पबद्दल?

या जाहिरातीलमध्ये लिहिलेले आहे की, ‘आठ वर्षांच्या सनी पवार या अभिनेत्याला अमेरिकेचा व्हिजा मिळवण्यासाठी आम्हाला पराकोटीचे प्रयत्न करावे लागले. कदाचित पुढच्या वर्षी तसा पर्यायसुद्धा अस्तित्वात नसेल.’ सोबत सनीचे चित्रपटातील पोस्टर असून सिनेमाच्या नावाखाली टॅगलाईन दिली की, ‘तुमचे मूळ कधीच विसरू नका!’

                                     Lion Ad

गॅरेथ डेव्हिस दिग्दर्शित या चित्रपटाला यंदाच्या आॅस्कर पुरस्कारांमध्ये सहा नामांकने मिळालेली असून देव पटेल, निकोल किडमन, रूनी मारा यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची बहुतांश शूटींग भारतात झाली असून नवाजुद्दिन सिद्दिकी, प्रियांका बोस, तनिष्ठा चटर्जी आणि दीप्ती नवल यांसह अनेक भारतीय कलाकारांनीसुद्धा यामध्ये काम केलेले आहे.

ALSO READ: ट्रम्पच्या अमेरिकेत मायली सायरस करणार नाही लग्न!

सरू ब्रिअर्ली लिखित ‘अ लाँग वे होम’ नावाच्या पुस्तकावर हा सिनेमा बेतलेला असून ही एक सत्यकथा आहे. कोलकात्यातील एक गरीब ५ वर्षीय मुलगा ‘सरू’ अपघाताने हरवल्यावर त्याला आॅस्ट्रेलियन दाम्पत्य दत्तक घेऊन आॅस्ट्रेलियाला घेऊन जाते. दूरवर आॅस्ट्रेलियातील टस्मानिया शहरात राहणाऱ्या सरूला मात्र घरची आठवण स्वस्थ बसू देत नाही. भारतात मागे राहिलेल्या मूळ कुटुंबाला भेटण्यासाठी मग सुरू होता त्याचा अवघड शोधप्रवास. ‘गुगल अर्थ’सारख्या तंत्रज्ञानाचा वापर करून तो घर शोधू लागतो. या प्रवासात त्याला येणारे अनुभवांचे दर्शन म्हणजे हा चित्रपट आहे.

देव पटेलला सर्वोत्कृष्ट सहकलाकार या कॅटेगरीत आॅस्क र नामांकन मिळाले आहे. त्याच्यासाठी आॅस्कर या पुरस्कार सोहळ्यात नामांकन मिळणे ही खूपच मोठी गोष्ट आहे. इतक्या मोठ्या पुरस्काराचे नामांकन मिळाले यावर त्याचा आजही विश्वास बसत नाहीये. तो सांगतो, ‘खरे सांगू तर मला आॅस्करचे नामांकन मिळाले यावर माझा आजही विश्वास बसत नाहीए. मला पुरस्कार सोहळ्यासाठी नामांकन मिळाल्याचा फोन आला होता. यानंतर माझ्या घरचे आणि मित्र प्रचंड खूश झालेत. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मला खूप बरं वाटत आहे. आॅस्करचे नामांकन मिळाल्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणे कठीण आहे.’ 

ALSO READ: ​मेरिल स्ट्रीपने ट्रम्प यांना सुनावले

Web Title: TRAVEL BAN: Producer of 'Lion' printed 'advertisement' against Donald Trump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.