अखेर नोबिता व शिजूकाचे लग्न होणार! बातमी ऐकून इमोशनल झाले फॅन्स, ट्विटरवर टॉप ट्रेंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2021 02:34 PM2021-01-20T14:34:08+5:302021-01-20T14:35:03+5:30
तुम्हीही बच्चेकंपनीसोबत कार्टून एन्जॉय करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.
तुम्हीही बच्चेकंपनीसोबत कार्टून एन्जॉय करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. डोरेमॉनचे नाव तर तुम्ही ऐकलेच असेल. डोरेमॉन हा भारतातील सर्वात लोकप्रिय कार्टून शो आहे. हा डोरेमॉन बच्चेकंपनीला जितका आवडतो, तितकाच त्याचा मित्र नोबिता हाही चिमुकल्यांचा आवडता आहे. हा नोबिता कोणासाठी वेडा आहे, तर तर तुम्हाला ठाऊक असेलच. नोबिता सतत शिजूकाच्या मागेपुढे करतो. तिला इम्प्रेस करण्याची एकही संधी तो सोडत नाही. तर आता याच शिजूका व नोबिताचे लग्न होणार आहे. आहे ना मजेदार?
Nobita is finally getting married to Shizuka🥺🥺
— Sharon #Judaiyaan (@Sharon_drdz) January 19, 2021
Where's Dekisugi now?😏 pic.twitter.com/P35KGr54RZ
होय, डोरेमॉनचा नवा सिनेमा लवकरच प्रदर्शित होतोय आणि यात शिजूका व नोबिताचे लग्न दाखवले जाणार आहे. या सिनेमाचे नाव ‘स्टँड बाय मी डोरेमॉन 2’ असे आहे. 2014 साली या सिनेमाचा पहिला पार्ट रिलीज झाला होता.
Hold awnnn can we talk about Nobita marrying Shizuka?? They’re living “i’m married my childhood friend” life i’m in tearssss 😭😭😭 pic.twitter.com/NABUnf1zfM
— K ❆ (@keinieve) January 19, 2021
पहिल्या पार्टमध्ये डोरेमॉन व नोबिताची पहिली भेट आणि त्यांच्या अॅडव्हेंवरबद्दल दाखवण्यात आले होते. आता दुस-या भागात नोबिता व त्याची बालमैत्रिण शिजूकाच्या लग्नावर आधारित आहेत.
नोव्हेंबर 2020 मध्ये ‘स्टँड बाय मी डोरेमॉन 2’जपानमध्ये रिलीज झाला होता. फेबु्रपारी 2021 मध्ये हा सिनेमा इंडोनेशियात रिलीज होणार आहे.
when this release i’ll be sending off my childhood for the last time and i’ll literally get all emotional watching nobita marrying shizuka and doraemon there be looking so proud of him 🥺 pic.twitter.com/HDtSSc6QCY
— ᰔ — (@SH3NYU3) January 19, 2021
ट्विटरवर होतेय ट्रेंड
नोबिता व शिजूकाचे लग्न होणार म्हटल्यावर ट्विटरवर कमेंट्सचा पाऊस पडतोय. नोबिता व शिजूकाचे लग्न टिष्ट्वटरवर नंबर 1 ला ट्रेंड करतोय.
Nobita got married a true inspiration 😂😂😂
— Rheu 😍 😍 (@arnab4648) January 19, 2021
My childhood is finally complete now pic.twitter.com/ZT7iN6zZJp
या कार्टून शोवर प्रेम करणा-या अनेकांनी आपआपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ‘हा सिनेमा रिलीज होईल आणि मी नोबिता व शिजूकाचे लग्न बघेन तेव्हा नक्कीच माझ्या डोळ्यांत अश्रू असतील,’ असे एका युजरने लिहिले.
Another chapter for me to cry ? and nobita is finally marrying shizuka after all of these years ?!?! 😭😭😭
— 맠뽐슨녕영뱀겸 (@got7legsandtoes) January 19, 2021
he really said “i’m marrying my childhood friend” 😍 pic.twitter.com/oT7kZfSwbJ
अन्य एका युजरने लिहिले, ‘प्लीज, प्लीज, मी नोबितासाठी रडणार आहे.’ काहींनी यावर मजेदार कमेंट्सही दिल्यात. ‘2021 मध्ये नोबिता व शिजूकाचे लग्न होणार आहे, आत्ता तरी 2021 आपल्यासाठी वाईट नव्हते हे मान्य करा,’ असे या युजरने लिहिले आहे.