'बेफिक्रे' गर्ल Vani kapoorसाठी 2021 ठरलं खास, रणबीर कपूरसोबत 'शमशेरा'त दिसणार वेगळ्या भूमिकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2021 16:26 IST2021-12-30T16:16:56+5:302021-12-30T16:26:32+5:30
'शमशेरा' चित्रपटात पीरिएड ड्रामा पाहायला मिळणार आहे . रणबीर कपूर व वाणी कपूर (Vaani Kapoor) यांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

'बेफिक्रे' गर्ल Vani kapoorसाठी 2021 ठरलं खास, रणबीर कपूरसोबत 'शमशेरा'त दिसणार वेगळ्या भूमिकेत
बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर (Vaani Kapoor) ने 'चंडीगढ करे आशिकी' (Chandigarh Kare Ashiqui) मध्ये करिअरमधील सर्वोत्तम भूमिका साकारली आहे. या सिनेमात तिने एका ट्रान्सजेंडर स्त्रीची भूमिका स्क्रीनवर अत्यंत संवेदनशीलतेने साकारली आहे.प्रेक्षकांना वाणीची ही भूमिका भावली. करिअरमध्ये हे वर्ष उत्तम गेल्याचं अभिनेत्री सांगते. .
वाणी सांगते, “एक कलावंत म्हणून हे वर्ष माझ्यासाठी अप्रतिम होते. 'चंडीगढ करे आशिकी'मुळे प्रेक्षकांचे खूप प्रेम व कौतुक माझ्या वाट्याला आले. त्यामुळे मला खूपच आनंद वाटत आहे. 2021 या वर्षाची सांगता याहून अधिक चांगली होऊच शकत नव्हती. सिनेमाच्या विश्वातील पुढील प्रवासासाठी मी आता खरोखरच उत्सुक आहे. हे विश्व आता माझे घर झाले आहे.” वाणी यानंतर वायआरएफच्या 'शमशेरा'मध्ये रणबीर कपूरसोबत दिसणार आहे. ही फिल्म 18 मार्च, 2022 रोजी रिलीज होणार आहे.
ती म्हणते, “शमशेरा रिलीजसाठी सज्ज असल्याने मी आता माझ्या अभिनयाची आणखी एक बाजू प्रेक्षकांपुढे आणण्यास उत्सुक आहे. शमशेरा सिनेमाचा भाग होण्याची संधी मिळणे म्हणजे एखादे स्वप्न प्रत्यक्षात उतरण्यासारखेच होते. करन मल्होत्रासारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. एक अभिनेत्री म्हणून मला खूप काही शिकायला मिळाले. रणबीर कपूर यात माझा को-स्टार आहे. दोन फिल्म्सनंतर पुन्हा वायआरएफसोबत काम करण्याचा अनुभव तर अधिकच खास होता.” वाणी पुढे सांगते, “प्रेक्षक कधी एकदा शमशेरा बघतील आणि आम्ही टीम म्हणून केलेले काम त्यांच्यापुढे येईल, असे मला झाले आहे.”