WATCH : ​‘कार्स ३’ टीझर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2016 11:46 AM2016-11-22T11:46:32+5:302016-11-22T11:46:32+5:30

४५ सेकंदाचे हे टीझर ट्रेलर पाहून तरी या चित्रपटामध्ये धमोकदार रेसिंग आणि अ‍ॅक्शन पाहायला मिळणार असे दिसतेय.

WATCH: 'Cars 3' teaser | WATCH : ​‘कार्स ३’ टीझर

WATCH : ​‘कार्स ३’ टीझर

googlenewsNext
ान मुलांचा फेव्हरेट आणि बहुप्रतीक्षीत ‘कार्स ३’ सिनेमाचे पहिले टीझर इंटरनेटवर दाखल झाले. ४५ सेकंदाचे हे टीझर ट्रेलर पाहून तरी या चित्रपटामध्ये धमोकदार रेसिंग आणि अ‍ॅक्शन पाहायला मिळणार असे दिसतेय. कार्स चित्रपटात कार या माणसांप्रमाणेच बोलतात, वागतात असे दाखविण्यात आले आहे.

टीझरमध्ये आपल्याला सुरुवातीला रेसिंग ट्रॅकवर स्पोर्ट्स कार्स सुसाट्याने धावताना दिसतात. मग मुख्य हीरो लाईटनिंग मॅक्विन ही कार (क्रमांक ९५)  दिसते आणि पाहता पाहता तिचा भीषण अपघात होतो. ‘या क्षणानंतर, सर्व काही बदलून जाणार’ अशा मेसेजसही टीझर संपतो.

पहिल्या ‘कार्स’ (२००६) सिनेमाने ४६२.२ मिलियन डॉलर्सची कमाई केली होती आणि आॅस्कर नामांकनही मिळाले होते. त्यानंतर पाच वर्षांनी आलेल्या ‘कार्स २’नेदेखील ५६२.१ मिलियन डॉलर्ससह तिकिट खिडकीवर गडगंज कमाई केली होती. विशेष म्हणजे पिक्सार स्टुडिओसाठी हा आॅस्कर नामांकन न मिळालेला पहिला चित्रपट ठरला.


कार्स : लाईटनिंग मॅक्विन (ओवेन विल्सन)

चित्रपटात मुख्य पात्राला ओवेन विल्सनने आवाज दिलेला असून या तिसऱ्या भागात क्रुझ रॅमीरेझ या नवख्या तंत्रज्ञाच्या मदतीने तो नव्या पीढीच्या रेसर्ससोबत स्पर्धा करणार आहे. त्याच्यासोबत मेटर (लॅरी द केबल गाय), सॅली (बॉनी हंट) आणि रॅमोन (चीच मेरिन) ही पात्रेदेखील पुन्हा एकदा धमाल करताना दिसणार आहेत.

निर्मात्यांनी २०१३ मध्येच ‘कार्स ३’ची घोषणा केली होती. पहिल्या दोन ‘कार्स’ सिनेमासाठी स्टोरीबोर्ड आर्टिस्ट म्हणून काम करणारा ब्रायन फी या तिसऱ्या पार्टचा दिग्दर्शक आहे. पुढील वर्षी १६ जून रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. टीझरमुळे तर याबाबत उत्सुकता ताणली गेलेली आहे. आता ट्रेलर कधी येणार अशी चाहते विचारणा करत आहेत.

ट्रेलर येईल तेव्हा येईल. आगोदर तुम्ही हे टीझर बघा आणि सांगा आम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये कसा वाटले ते.

                                         

Web Title: WATCH: 'Cars 3' teaser

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.