​WATCH : टॉम क्रुझने केला ‘द ममी’चा फर्स्ट लूक शेअर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2016 01:05 PM2016-12-02T13:05:12+5:302016-12-02T13:07:36+5:30

विशेष म्हणजे यंदा कोणी पुरुष ममी नसून प्रथमच ममीचे पात्र एका महिला करीत आहे.

WATCH: Tom Cruise's 'The Mummy' First Look Stock | ​WATCH : टॉम क्रुझने केला ‘द ममी’चा फर्स्ट लूक शेअर

​WATCH : टॉम क्रुझने केला ‘द ममी’चा फर्स्ट लूक शेअर

googlenewsNext
लीवूड सुपरस्टार टॉम क्रुझ आता पुन्हा एकदा अ‍ॅडव्हेंचरसाठी सज्ज झाला आहे. यावेळी त्याचा सामना कोण्या सामान्य व्यक्तीशी नाही तर थेट गतकाळातील राक्षसांसोबत आहे. आगामी ‘द ममी’ चित्रपटाची त्याने नुकतीच पहिली झलक शेअर केली.

द ममी’ फ्रँचाईजीला रिबूट करणाऱ्या या चित्रपटात हजारो वर्षांनंतर आजच्या काळात पुन्हा जिवंत झालेल्या ‘ममी’शी टॉम क्रुझ दोन हात करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे यंदा कोणी पुरुष ममी नसून प्रथमच ममीचे पात्र एका महिला करीत आहे.

‘स्टार ट्रेक बियॉन्ड’ फेम सोफिआ बौटेला ममीच्या भूमिकेत दिसणार आहे. भूतकाळातील ही महाराणी तिचा हक्क परत मिळवण्यासाठी या काळात पुन्हा जागी होते आणि तिच्या रागापासून वाचण्याची जबाबदारी आॅल टाईम अ‍ॅक्शन स्टार टाम क्रुझवर आहे.

‘मिशन इम्पॉसिबल ३’चा लेखक अ‍ॅलेक्स कुर्त्झमन हा चित्रपट दिग्दर्शित करत असून ‘प्रोमथिअस’चा पटकथाकार जॉन स्पेहटस्ने स्क्रीप्ट लिहिलेली आहे. क्रुझ आणि बौटेलासोबत सिनेमात रसेल क्रो, अ‍ॅनाबेल वॉलिस (पिकी ब्लार्इंडर्स), जेक जॉन्सन (न्यू गर्ल्स) आणि कोर्टनी वॅन्स (अमेरिक न क्राईम स्टोरी) अशी तगडी स्टार कास्ट आहे.

                                        

टीझर बरोबरच फिल्मचे पोस्टरही रिलीज करण्यात आले. पुढील वर्षी ९ जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. एवढेच नाही तर, ‘मॉन्स्टर’ फिल्मच्या चाहत्यांसाठी एका खुश खबर आहे.

                                         

लवकरच ड्रॅक्युला, द वुल्फमॅन, फ्रँकेस्टाईन, द इन्व्हिजिबल मॅन, द ब्राईड आॅफ फ्रँन्स्टाईन आणि वॅन हेल्सिंग या चित्रपटांनासुद्धा नव्या कास्टसह रिबूट करण्यात येणार आहे. सगळे मॉन्स्टर्स मिळून एक ‘अँव्हेजर’ स्टाईल चित्रपटाचासुद्धा योजना आहे. तत्पूर्वी तुम्ही चित्रपटाच्या टीझरचा आनंद घ्या.

Web Title: WATCH: Tom Cruise's 'The Mummy' First Look Stock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.