नेओमी कॅँपेबलने जॉर्ज मायकलच्या गाडीवर का फेकले होते अंडे?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2017 04:14 PM2017-02-10T16:14:34+5:302017-02-10T21:44:34+5:30
सुपरमॉडल नेओमी कॅँपेबल हिने दिवंगत गायक जॉर्ज मायकल याच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ती म्हणाली की, एकदा मी जॉर्ज ...
स परमॉडल नेओमी कॅँपेबल हिने दिवंगत गायक जॉर्ज मायकल याच्यासोबतच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. ती म्हणाली की, एकदा मी जॉर्ज मायकल याच्या गाडीवर अंडे फेकले होते, कारण मी त्याच्या बॅण्डची जबरदस्त प्रशंसक आहे.
पेजिसक्स डॉट कॉम या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, नेओमी म्हणाली की, मी त्यांना (मायकल) ‘फ्रीडम-९०’ व्हिडीओमध्ये काम करण्याअगोदरपासून ओळखत आहे. मी कल्चर क्लबच्या दोन व्हिडीओमध्ये काम केलेले आहे.
या घटनेचे स्मरण करताना नेओमी म्हणतेय की, या घटनेच्या कित्येक वर्षांनंतर जेव्हा मायकल ‘फ्रीडम-९०’ व्हिडीओ बनविण्यासाठी ते लॉस एजेंलिस येथे आले होते. तेव्हा ते माझ्याजवळ येऊन म्हणाले होते की, मुली माझ्यावर त्यांचा हक्क गाजविण्यासाठी दडपण आणत आहेत आणि माझ्या ऐकण्यात आले की, त्यांची लीडर कॅँपेबल आहे.
कदाचित त्यांना कॅँपेबल कोण हे माहीत नसावे त्यामुळेच त्यांनी माझ्यासमोर सर्व गोष्टींचा भांडाफोड केला, पण मीही त्यांची फिरकी न घेता थेट सांगितले की, मीच कॅँपेबल आहे. आता तुम्ही मला दोन कॉनकोर्ड तिकीट द्या! यावर मायकलने स्मित हास्य करीत माझ्याकडे बघितले. तसेच मला कॉनकोर्डचे दोन तिकीटही दिलेत. आजही मायकल यांच्यासोबतचे ते क्षण आठविल्यानंतर मन भरून येते.
नेओमीने सांगितले की, मायकल हे हॉलिवूडमध्ये नेहमीच स्मरणात राहणारं नाव आहे. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या आठवणी बºयाचशा कलाकारांसोबत जुळलेल्या आहेत. कारण त्यांचे इंडस्ट्रीमधील योगदान अधोरेखित करणारे असल्याचे कॅँपेबलने सांगितले. यावेळी ती खूपच भावुक झाल्याचे बघावयास मिळाले.