वर्षभरात मोडला मिया खलिफाचा दुसरा संसार; जाणून घ्या कोण होता तिचा दुसरा पती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 02:52 PM2023-04-25T14:52:10+5:302023-04-25T14:52:40+5:30

Mia khalifa: मियाने २१ जुलै २०२१ मध्ये रॉबर्ट सँडबर्ग याच्यासोबत लग्न केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही.

why mia khalifa divorced ex husband robert sandberg after one year of marriage know reason | वर्षभरात मोडला मिया खलिफाचा दुसरा संसार; जाणून घ्या कोण होता तिचा दुसरा पती

वर्षभरात मोडला मिया खलिफाचा दुसरा संसार; जाणून घ्या कोण होता तिचा दुसरा पती

googlenewsNext

काही वर्षांपूर्वीच पॉर्न इंडस्ट्रीला रामराम करत सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर झालेली सेलिब्रिटी म्हणजे मिया खलिफा (mia khalifa). एकेकाळी पॉर्न व्हिडीओमुळे चर्चेत येणारी मिया सध्या तिच्या पर्सनल लाइफमुळे चर्चेत येत आहे. मियाचा पुन्हा एकदा दुसऱ्यांदा संसार मोडला आहे. त्यामुळे तिच्या घटस्फोटाची नेटकऱ्यांमध्ये चर्चा होत आहे.

'पिंकव्हिला'च्या वृत्तानुसार, मियाने २१ जुलै २०२१ मध्ये रॉबर्ट सँडबर्ग याच्यासोबत लग्न केलं. मात्र, त्यांचा संसार फार काळ टिकला नाही. दीड-दोन वर्षामध्येच त्यांचा संसार मोडला आहे. मिया आणि रॉबर्टने घटस्फोट घेतला असून या घटस्फोटामागील कारण मियाने नुकतंच सांगितलं आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत मियाने घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं.

“आम्ही लग्न टिकावं यासाठी पुरेपूर प्रयत्न केला. जवळपास वर्षभर आम्ही प्रयत्न केले. मात्र, या प्रयत्नानंतर आम्ही वेगळे होत आहोत. आम्ही एकमेकांचे चांगले मित्र  आहोत. त्यामुळेच लग्न वाचवायचा प्रयत्न केला होता. आमचं कायम एकमेकांवर प्रेम असेल, एकमेकांप्रती आदर असेल. पण, आमच्या विभक्त होण्यामागचं कारण फक्त मतभेद आहेत. त्यामुळे या मतभेदांमुळे आम्ही दोघंही एकमेकांना दोष देऊ शकत नाही, असं मियाने तिच्या पोस्टमध्ये म्हटलं.
मियाचं पहिलं लग्नही मोडलं. मियाने २०११मध्ये लग्न केलं होतं. मात्र, त्यांचा संसार फक्त ३ वर्ष टिकला. २०१४ मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर तिने रॉबर्टसोबत दुसरं लग्न केलं.

रॉबर्ट सँडबर्गसोबत केलं दुसरं लग्न

रॉबर्टने २०२० मध्ये मियाला प्रपोज केलं. त्यानंतर २०२१ मध्ये त्यांनी लग्न केलं. रॉबर्ट व्यवसायाने एक शेफ असून तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो.

झाय कॉर्टेझला डेट करतीये मिया?

मियाने झाय कॉर्टेझ याच्यासोबत एका युट्यूब व्हिडीओमध्ये काम केलं होतं. तेव्हापासून त्यांच्या डेटिंगच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मात्र, याविषयी दोघांनीही अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
 

Web Title: why mia khalifa divorced ex husband robert sandberg after one year of marriage know reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.