कोलीन फर्थ ‘मेरी पॉपिन्स रिटर्न्स’मध्ये दिसणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2016 04:00 PM2016-10-21T16:00:24+5:302016-10-21T16:00:24+5:30
आॅस्कर विजेता अभिनेता कोलिन फर्थ आगामी ‘मेरी पॉपिन्स रिटर्न्स’ चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्यांशी बोलणी करत आहे. ‘विल्यम विदरॉल विल्किन्स’च्या ...
आ स्कर विजेता अभिनेता कोलिन फर्थ आगामी ‘मेरी पॉपिन्स रिटर्न्स’ चित्रपटात काम करण्यासाठी निर्मात्यांशी बोलणी करत आहे. ‘विल्यम विदरॉल विल्किन्स’च्या भूमिकेसाठी त्याला विचारणा झाली आहे. १९६४ साली आलेल्या ‘मेरी पॉपिन्स’ सिनेमाचा हा सिक्वेल आहे.
डिप्रेशन काळातील लंडनमध्ये या नव्या चित्रपटाचे कथानक बेतलेले असून मोठेपणीच्या जेन आणि मायक ल बँक्स यांच्या आयुष्यात रहस्यमयी मेरी पॉपिन्स पुन्हा एकदा आनंद भरते आणि त्यांच्या अडचणी दूर करते.
सर्व काही जमून आले तर कोलिनसोबत या चित्रपटात तो एमिली ब्लंट आणि ब्रॉडवे स्टार लिन-मॅन्युएल मिरांडासोबत स्क्रीन शेअर करताना दिसेल. एमिली जादुई नॅनीच्या भूमिकेत तर मिरांडा पथदिवे लावणाऱ्याच्या एका नव्याच व्यक्तिरेखेत दिसणार आहे. तसेच एमिली मॉर्टायमर मेरी पॉपिन्सच्या मुलांपैकी एक जेन बँक्सची भूमिका साकारणार आहे.
विशेष म्हणजे बॉण्डपट ‘स्कायफॉल’मधून प्रसिद्धीस आलेला बेन विशॉ जेनच्या मोठा भाऊ मायक लचा रोल करणार आहे. हॉलीवूड रॉयल्टी मेरिल स्ट्रीप मेरीची बहीण टॉप्सी म्हणून या चित्रपट दिसणार आहे. रॉब मार्शल दिग्दर्शित हा चित्रपट २०१८ साली डिसेंबर महिन्यात नाताळाच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे.