जेनेफर अ‍ॅनिस्टन पुन्हा दिसणार का टीव्हीवर?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2017 02:32 PM2017-01-20T14:32:24+5:302017-01-20T20:02:24+5:30

‘फ्रेंड्स’ स्टार जेनेफर अ‍ॅनिस्टनला पुन्हा एकदा टीव्हीवर परतायचे आहे. छोट्या पडद्यावर काम करण्याची इच्छा तिने स्वत: एका मुलाखतीमध्ये बोलून ...

Will Jennifer Aniston appear on TV again? | जेनेफर अ‍ॅनिस्टन पुन्हा दिसणार का टीव्हीवर?

जेनेफर अ‍ॅनिस्टन पुन्हा दिसणार का टीव्हीवर?

googlenewsNext
्रेंड्स’ स्टार जेनेफर अ‍ॅनिस्टनला पुन्हा एकदा टीव्हीवर परतायचे आहे. छोट्या पडद्यावर काम करण्याची इच्छा तिने स्वत: एका मुलाखतीमध्ये बोलून दाखवली. नव्वदच्या दशकात ‘फ्रेंड्स’ या मालिकेतील ‘रेचल’ या भूमिकेमुळे तिला जगभरात ओळख मिळाली होती.

टीव्हीनंतर तिने मोर्चा चित्रपटांकडे वळवला होता. अनेक सुपरहिट सिनेमांतून काम केलेल्या या ४७ वर्षीय अभिनेत्रीला आता पुन्हा एकदा टीव्हीचे वेध लागले आहेत. ती म्हणते, ‘आजकाल टीव्हीवर जे प्रोग्राम आणि कार्यक्रम बनवले जात आहेत ते चित्रपटाच्या तोडीस तोड आहे. टीव्ही शोची गुणवत्ता आणि त्यातील वैविध्यपूर्ण कथानकांमुळे मला पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर काम करण्याची इच्छा निर्माण झाली आहे.’

‘केक’सारख्या चित्रपटातील गंभीर भूमिकेमुळे समीक्षकांची वाहवाह मिळवलेली जेनेफर सांगते की, ‘मी याविषयी खूप विचार करतेय. टीव्हीवर ज्यापद्धतीने काम सुरू आहे ते पाहून आपणही त्यामध्ये सहभागी व्हावे, असे मला वाटतेय. करिअरच्या ज्या टप्प्यावर मी आहे तेथे मला वेगवेगळ्या गोष्टींचा भाग व्हायला आवडेल. नवनवीन भूमिका कराण्याचे आव्हान पेलवायला आवडेल.’

ALSO READ: ​जेनिफर अ‍ॅनिस्टनच्या नवऱ्याची ब्रॅड पिटवर आगपाखड

मनोरंजन विश्वातील तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल ती पूर्णत: समाधानी आहे. ती म्हणते, ‘मला जे यश मिळाले आहे त्यासाठी खूप आनंदी आहे. परंतु वयाच्या या टप्प्यावर मला करिअरपेक्षा वैयक्तिक आयुष्य जास्त महत्त्वाचे वाटते. विशीत असताना तुम्हाला घरापासून दूर जाण्यात अ‍ॅडव्हेंचर वाटते परंतु तुम्ही जसे मोठे होतात तसे तुम्हाला आपल्या कुटुंबियांच्या जवळ राहण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नाही. त्यामुळे करिअर, यश, प्रसिद्धी, लोकप्रियतेच्या मागे धावण्याऐवजी मला आयुष्यात स्थैर्य हवे आहे.’

जेनेफर अ‍ॅनिस्टन आणि ब्रॅड पिट एकेकाळी पती-पत्नी होते. परंतु अँजेलिना जोलीच्या प्रेमात पडल्यामुळे ब्रॅडने तिला घटस्फोट दिला. त्याकाळी हे खूप मोठे स्कँडल ठरले होते. जेनेफर सध्या जस्टीन थेरॉक्सशी विवाहित आहे. ब्रँजेलिनाच्या घटस्फोटानंतर तिने ‘हे तर होणारच होते’ अशी तिखट प्रतिक्रिया दिली होती असल्याचे वृत्त होते.

ALSO READ: जेनिफरच्या जंपसूटची किंमत ३५५४ पौंड

Web Title: Will Jennifer Aniston appear on TV again?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.