Gal Gadot ने शेअर केला शाहीन बागमधील आजीचा फोटो, म्हणाली - खरी Wonder Woman
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2021 15:20 IST2021-01-01T15:18:23+5:302021-01-01T15:20:04+5:30
गॅल गॅडोत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव राहते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Gal Gadot ने शेअर केला शाहीन बागमधील आजीचा फोटो, म्हणाली - खरी Wonder Woman
हॉलिवूड सिनेमा 'वंडर वुमन 1984' या सिनेमाला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. सिनेमाला परदेशासोबतच भारतातही चांगली प्रतिसाद मिळत आहे. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री गॅल गॅडोटचं कौतुक केलं जात आहे. तिने पुन्हा एकदा तिच्या अभिनयाने आणि सुंदरतेने प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे.
गॅल गॅडोत सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव राहते. ती नेहमीच तिचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने वर्ष संपण्यानिमित्ताने रिअल लाइफ वंडर वुमन्सचे फोटो शेअर केले आहेत. यातील एक फोटो पाहून सर्वांनाच आश्चर्य झालं आहे. कारण हा फोटो आहे शाहीन बागमधील CAA, NRC प्रोटेस्टमधील आजी बिल्कीस बानो यांचा.
हे फोटो शेअर करत गॅलने कॅप्शन लिहिले की, '२०२० संपताना माझ्या मनातील #MyPersonalWWderderWomen वर. यातील काही माझ्या अधिक जवळ आहेत. माझा परिवार, माझे मित्र, काही प्रेरक महिला. ज्यांच्यावर माझं प्रेम आहे. काही असाधारण महिला आहेत ज्यांच्याकडून मला आशा आहे. भविष्यात भेटुया. एकत्र आपण चमत्कार करू शकतो'.
गॅल गॅडोतने शेअर केलेले हे फोटो तिच्या फॅन्सना चांगलेच आवडले आहेत. तिचे फॅन्स भरभरून या फोटोंवर कमेंट करत आहेत. हे फोटो व्हायरलही झाले आहेत. बिल्कीस बानो यांच्यासोबतच गॅल गॅडोतच्या वंडर वुमन लिस्टमध्ये पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न, अमेरिकेच्या नव्या उपराष्ट्रपती कमला हेरिस, गॅल गॅडोटचा परिवार आणि तिच्या काही मैत्रीणींचा समावेश आहे.