नाट्यसृष्टीसाठी आशादायी वर्ष..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2017 06:43 AM2017-12-31T06:43:47+5:302017-12-31T06:43:54+5:30

नाटकांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत असे मला वाटते. या वर्षाच्या शेवटी नव्याने आलेली काही नाटके चांगली आहेत. जरी यातली काही नाटके एकांकिकेवरून केलेली असली, तरी त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ कलाकारच नव्हे; तर युवा निर्माते सध्या नाट्यक्षेत्रात येत आहेत. असे तरुण निर्माते जेव्हा नवीन नाटके घेऊन येतात

 Hopeful year for theater ..! | नाट्यसृष्टीसाठी आशादायी वर्ष..!

नाट्यसृष्टीसाठी आशादायी वर्ष..!

googlenewsNext

- वंदना गुप्ते

नाटकांना सध्या सुगीचे दिवस आले आहेत असे मला वाटते. या वर्षाच्या शेवटी नव्याने आलेली काही नाटके चांगली आहेत. जरी यातली काही नाटके एकांकिकेवरून केलेली असली, तरी त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. केवळ कलाकारच नव्हे; तर युवा निर्माते सध्या नाट्यक्षेत्रात येत आहेत. असे तरुण निर्माते जेव्हा नवीन नाटके घेऊन येतात; तेव्हा नाट्यसृष्टीचा उत्साह अधिक वाढतो. नव्या जोमाने ही मंडळी नाटके सादर करताना दिसतात. या निर्मात्यांना प्रेक्षकांनीही तसाच उत्साही प्रतिसाद द्यायला हवा.

नाटकांमधून विचार देण्याचा प्रयत्न
सध्या रंगभूमीवर आलेली नाटके केवळ करमणूकप्रधान नाहीत; त्यातून काहीएक विचार देण्यात येत असल्याचे दिसते. हीच परंपरा नवीन वर्षातही सुरू राहील याची मला खात्री आहे. सामाजिक बाजूचाही विचार यात केलेला दिसतो ही बाब मला आश्वासक वाटते आणि नवीन वर्ष नाट्यसृष्टीसाठी आशादायी असेल, याची मला खात्री आहे.

राठी रसिकांना जितके नाटकांचे वेड आहे, तितके चित्रपटांचे नाही. कारण रांगेत उभे राहून रसिक नाटकाची तिकिटे विकत घेताना दिसतात. पण चित्रपटांचे मात्र तसे होत नाही. चित्रपट प्रदर्शित झाल्यावर पहिल्या आठवड्यातसुद्धा तिकिटांसाठी गर्दी दिसून येत नाही. पुढे कधीकाळी चित्रपट टीव्हीवर लागला की पाहू, अशी मनोवृत्ती प्रेक्षकांची आढळते. सध्या मराठी चित्रपट मोठ्या प्रमाणावर प्रदर्शित होत असले, तरी त्याचा निर्मात्यांना आर्थिकदृष्ट्या फारसा फायदा होत नाही. कारण या चित्रपटांना प्रेक्षकवर्गच मिळत नाही. पण प्रेक्षकांनी त्यांना चांगला प्रतिसाद दिला; तरच हे निर्माते पुढे जाऊन अधिक काही चांगले करू शकतील असे मला वाटते.
पण नाटक आणि चित्रपट या दोन्ही क्षेत्रांबाबत अलीकडे एक सामायिक बाब घडली, ती म्हणजे नोटाबंदी! यामुळे नाटक व चित्रपट या दोघांनाही मोठा फटका बसला. नेहमीच कुठल्या तरी लढाईला तोंड देत नाटक चालू ठेवायचे, म्हणजे त्या निर्मात्याला फारच कसरत करावी लागते. नोटाबंदीचा थेट परिणाम नाटकांवर झाला आणि प्रेक्षकसुद्धा टीव्हीकडे जास्त वळला. फुकटात करमणुकीला प्राधान्य मिळाले. अगदीच नाट्यवेडा प्रेक्षक जो आहे, तो मात्र आहेच. पहिल्या १० रांगांतला प्रेक्षक कुठे जात नसतो. पण केवळ त्यांच्यावर अवलंबून राहून
नाटक चालत नाही. शासनाच्या अनुदानामुळे नाट्य निर्मात्यांना थोडा हातभार लागतो, ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणावी लागेल. मात्र मोठ्या ज्या नाट्यसंस्था आहेत, म्हणजे ज्यांच्या नाटकांवर परिवार अवलंबून असतो; त्या सध्या मागे पडताना दिसत आहेत आणि नवीन निर्माते नाट्यसृष्टीत आढळून येत आहेत. या सगळ्या स्थितीत नवीन वर्षात मी नाटकांविषयी आशावादी आहे; परंतु चित्रपटांच्या बाबतीत मात्र नाही. काहीतरी गिमिक्स करून, मार्केटिंगवर निर्मात्यांनी इतका खर्च केल्यावरही, प्रेक्षक चित्रपटांना येतोच असे काही नाही. प्रेक्षकांना नाटकाकडे एकवेळ वळवता येऊ शकते, मात्र चित्रपटांकडे प्रेक्षकांना खेचून आणणे खूप कठीण आहे. मी जेव्हा चित्रपट निर्मिती केली तेव्हा मी प्रेक्षकांना आवाहन केले होते, की मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघा. कारण प्रेक्षकांशिवाय मराठी चित्रपट तग धरू शकत नाही. अशा स्थितीत केवळ चॅनेल्सवर अवलंबून राहणे भाग पडते. खर्च निघून येण्यापुरते समाधान त्यातून मिळते. नवीन वर्षात माधुरी दीक्षितचा मराठी चित्रपट येत आहे. आतापासूनच या चित्रपटाची जोरात चर्चा सुरू झाली आहे. या चित्रपटात गुंतवलेला पैसा निर्मात्याच्या पुन्हा हाती येऊ शकेल. माधुरी मोठी स्टार असल्याने तिला चांगला प्रतिसाद हा मिळणारच. पण अशा पद्धतीने काही वेगळे केले तरच, मराठी चित्रपटांना गर्दी होऊ शकेल. प्रियांका चोप्रासुद्धा मराठी चित्रपट निर्मितीत आली आहे. अमराठी निर्मात्यांचे लक्ष आता मराठी चित्रपटांकडे वळले आहे. मराठी चित्रपटांना चॅनेल्सनीसुद्धा पाठिंबा दिला पाहिजे. आतापर्यंत चॅनेल्स मराठी चित्रपटांचे हक्क हमखास घ्यायचे. तसेच यापुढेही व्हायला हवे.
(लेखिका अभिनेत्री आहेत.)
 

Web Title:  Hopeful year for theater ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cinemaसिनेमा