Supermodel Monica Huldt: "मी इतकी हॉट आहे की आता मी...."; अमेरिकन सुपरमॉडेलने घेतला अजब निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2023 01:00 PM2023-01-13T13:00:23+5:302023-01-13T13:01:03+5:30
"मी जेव्हा जिममध्ये जाते तेव्हा काही लोक मुद्दामून माझ्याजवळ येतात आणि ..."
Supermodel Monica Huldt: मोनिका हुल्ड ही अमेरिकेतील ऍरिझोना येथे राहते. मूळची पोलिश मॉडेल मोनिका हिचे इंटरनेट विश्वात लाखो चाहते आहेत. इंस्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. पण अमेरिकन सुपरमॉडेल असलेल्या मोनिकाने सध्या एक अजब दावा केला आहे. तिचे म्हणणे आहे की, ती इतकी हॉट आहे की जीममधील पुरुष अनेकदा तिला जाणूनबुजून धक्का मारतात. जेणेकरून चुकूनही ते तिला कोणत्या ना कोणत्या बहाण्याने स्पर्श करायचा प्रयत्न करत असतात. अशा विचित्र प्रकारच्या घटनांना कंटाळून मोनिकाला आता एक बॉडीगार्ड ठेवायचा निर्णयच घेतला आहे. ती त्या महिन्याला २ लाख रुपये पगार देणार असल्याचे तिने म्हटले आहे, पण त्या बॉडीगार्डने तिला जिममधील लोकांच्या घाणेरड्या स्पर्शापासून किंवा इतर घडणाऱ्या घटनांपासून वाचवलं पाहिजे असे त्या बॉडीगार्डचे काम असणार आहे.
मोनिका जिथे राहते तिथे ती आठवड्यातून किमान पाच वेळा जिममध्ये जाते. ही सौंदर्यवती आपल्या फिटनेसच्या बाबतीत खूपच जागरूक आहे. ती स्वत:ला तंदुरुस्त ठेवण्यासाठी जीममध्ये वर्कआऊट आणि ट्रेनिंगही घेते. पण तिचे जिम वर्कआऊट सुरू असताना तिला अनेकदा काही पुरूषांच्या घाणेरड्या नजरांचा सामना करावा लागतो. मोनिकाचा असा दावा आहे की, तिला लोकं वाईट नजरेने पाहतात पण ती लोकांच्या नजरा रोखू शकत नाही किंवा कोणाच्या डोळ्यांवर बंधन आणू शकत नाही. तिचा असाही दावा आहे की काही लोक तिच्याशी विनाकारण बोलण्याचा प्रयत्न करतात आणि त्यावेळी तिला जाणूनबुजून स्पर्श करतात. त्यामुळे बॉडीगार्ड ठेवून तिला अशा प्रवृत्तीच्या लोकांना अद्दल घडवायची आहे.
मोनिका जेव्हा सोशल मीडियावर काही पोस्ट करते तेव्हादेखील बरेच वेळा लोक कमेंट करून तिच्याकडे अश्लील मागणी करतात. मोनिका म्हणते की, ती अशा घाणेरड्या मेसेजमुळे कंटाळली आहे आणि आता अशा लोकांना ती सहन करू शकत नाही. पुरुषांच्या वागण्याने कंटाळलेली मोनिका म्हणते की जिम हे एक सुरक्षित सार्वजनिक ठिकाण असायला हवे पण लोक तिला तिथेही वाईट नजरेने पाहतात.
त्यासोबतच या सौंदर्यवतीने सांगितले की, अनेक वर्षांपूर्वी तिला काही विचित्र प्रसंगांना सामोरे जावे लागले. सामना करावा लागला होता. मोनिकाने सांगितले की, तिला अनेक वेळा वाईट घटनांना सामना करावा लागला होता. जेव्हा कुणी तिला वाईट नजरेने पाहते किंवा विचित्र बहाण्याने स्पर्श करते त्यावेळी तिला फार अस्वस्थ वाटते. त्यामुळेच ती आता थेट बॉडीगार्ड ठेवणार असल्याचे तिने सांगितले आहे.