आईसोबत सतत फिरते मग शाळेत जाते कधी? ऐश्वर्याने दिलं ट्रोलर्सला उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 11:26 AM2024-05-21T11:26:28+5:302024-05-21T11:26:54+5:30
Aishwarya rai:अलिकडेच आराध्या, ऐश्वर्यासह कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे पुन्हा एकदा आराध्याची सोशल मीडियावर चर्चा सुरु झाली आहे.
बॉलिवूडचं ऐश्वर्य अर्थात ऐश्वर्या राय-बच्चन (Aishwarya rai) हिची सोशल मीडियावर कायमच चर्चा होते. परंतु, गेल्या काही काळापासून ऐश्वर्याची लेक आराध्या बच्चन लाइमलाइटमध्ये येतीये. आराध्या १२ वर्षांची झाली असून आता कॅमेराच्या नजरा सातत्याने या स्टारकिड्सवर असतात. अलिकडेच आराध्या, ऐश्वर्यासह कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी झाली होती. या सोहळ्यात ऐश्वर्यासह आराध्याचंही नेटकऱ्यांनी कौतुक केलं. परंतु, आराध्या सातत्याने ऐश्वर्यासह फिरत असते मग ती शाळेत जाते कधी? असा प्रश्न नेटकऱ्यांनी उपस्थित केला आहे. इतकंच नाही तर यावरुन तिला ट्रोलही केलं. या प्रश्नाचं उत्तर ऐश्वर्याने एका मुलाखतीमध्ये दिलं आहे.
ऐश्वर्या कोणत्याही पुरस्कार सोहळा, विदेश दौऱ्यावर गेल्यानंतर कायम आराध्याला तिच्यासोबत घेऊन जाते. त्यामुळे आराध्या सतत ऐश्वर्यासोबत फिरत असते तर मग ती शाळेत कधी जाते असा प्रश्न नेटकऱ्यांना पडतो. अलिकडेच ऐश्वर्याने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने आराध्याच्या शाळेच आणि तिच्या विदेश दौऱ्यांविषयीचं प्लॅनिंग सांगितलं.
ऐश्वर्याने सांगितलं आराध्याच्या शाळेचं प्लॅनिंग
आराध्याच्या शाळेचा खाडा (सुट्टी) होऊ न देता मी बाहेर जाण्याचे प्लॅन करत असते. कधी कोणती फ्लाइट आहे कसं नियोजन करायचं हे आता मी सगळं शिकले. हेच नाही तर तिचं सगळं प्लॅनिंग मीच करते, असं ऐश्वर्या म्हणाली.
पुढे ती म्हणते,तुम्ही पाहिलं असेल आम्ही शक्यतो त्याचवेळी फिरायला जातो ज्यावेळी तिच्या शाळेला सुट्टी असेल. त्यानुसारच मी तिचं तसं नियोजन करते. सोमवारी आराध्याच्या शाळेचा खाडा होणार नाही याची मी काळजी घेते.
दरम्यान,आराध्या कायम ऐश्वर्याची सावली असल्यासारखं तिच्यामागे फिरत असते. ऐश्वर्या कुठेही गेली तरी आराध्याला कायम तिच्यासोबत घेऊनच जाते. यावरुन अनेकदा या मायलेकींना ट्रोलही व्हावं लागलं होतं.