Aryan Khan: ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा परिणाम; आर्यन खानसाठी शाहरुखनं घेतला महत्त्वाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2021 03:23 PM2021-11-12T15:23:29+5:302021-11-12T19:21:11+5:30

Aryan Khan: आर्यन खानच्या वाढदिवसाआधी शाहरुखनं घेतला महत्त्वाचा निर्णय

how aryan khan will celebrate his 24th birthday amid cruise drugs case controversy | Aryan Khan: ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा परिणाम; आर्यन खानसाठी शाहरुखनं घेतला महत्त्वाचा निर्णय

Aryan Khan: ड्रग्ज पार्टी प्रकरणाचा परिणाम; आर्यन खानसाठी शाहरुखनं घेतला महत्त्वाचा निर्णय

googlenewsNext

मुंबई: सुपरस्टार अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानचा १३ नोव्हेंबरला वाढदिवस आहे. आर्यन उद्या २४ वर्षांचा होईल. गेल्या २ महिन्यांपासून आर्यन खान अडचणीत आहे. ड्रग्ज पार्टीत सापडल्यानं आर्यनला एनसीबीनं अटक केली. जवळपास तीन आठवडे तो तुरुंगात होता. त्यानंतर त्याला मुंबई उच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. ड्रग्ज पार्टी प्रकरणाची सुनावणी उद्याप पूर्ण झालेली नाही. यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न आर्यनकडून सुरू आहे. त्यामुळे आर्यनचा वाढदिवस अतिशय साधेपणानं साजरा होईल.

आर्यनचे आतापर्यंतचे वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरे झाले आहेत. मात्र यावर्षी तसा वाढदिवस साजरा होण्याची शक्यता कमी आहे. इंडिया टुडेनं सुत्रांच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार, आर्यनचा २४ वा वाढदिवस अतिशय साधेपणानं साजरा होईल. वाढदिवसाला कुटुंबीय असतील. बहिण सुहाना अमेरिकेहून कौटुंबिक सोहळ्याला उपस्थित असेल.

आर्यनला गरजेनुसार स्पेस आणि प्रायव्हसी दिली जात आहे. हळूहळू तो ड्रग्ज प्रकरणात बसलेल्या धक्क्यातून बाहेर येत आहे. आर्यनचे आतापर्यंतचे वाढदिवस कुटुंब आणि मित्र परिवारानं मोठ्या धुमधडाक्यात साजरे केले आहेत. शाहरुखनं मुलाला परदेशांत फिरण्यासाठी पाठवलंय, महागडी गॅजेट्स दिली आहेत. विद्यापीठातील मित्रांनी आर्यनला सरप्राईस पार्टीज दिल्या आहेत. मात्र या वाढदिवसाला असं काही होणार नाही. मन्नतच्या चार भिंतींमध्येच आर्यनचा वाढदिवस साजरा होणार आहे.

आर्यनला मुंबई उच्च न्यायालयानं सशर्त जामीन दिला आहे. त्याला आठवड्यातून एक दिवस एनसीबीच्या कार्यालयात जाऊन हजेरी लावणं बंधनकारक आहे. आर्यनचा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा करण्याचा शाहरुखचा विचार होता. मात्र माध्यमांपासून आर्यनला दूर ठेवता यावं यासाठी शाहरुखनं अलिबागचा प्लान रद्द केला. आर्यनसाठी समुपदेशन सुरू करण्याचा शाहरुख आणि गौरी खानचा विचार आहे.

Web Title: how aryan khan will celebrate his 24th birthday amid cruise drugs case controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.