एकेकाळी 96 किलो होते अभिनेत्रीचे वजन, आईच्या एका सल्ल्याने झाला तिचा कायापालट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2021 08:52 PM2021-03-02T20:52:29+5:302021-03-02T20:57:56+5:30
सुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते. हे पाहून साराला अक्षरक्षा रडू कोसळले होते.
अल्पावधीतच इंडस्ट्रीमध्ये सारानं आपल्या अभिनयाने रसिकांची मनं जिंकली आहेत. मात्र अभिनेत्री बनण्यापर्यंतचा तिचा प्रवास इतका सोपा नव्हता. कारण आता दिसणारी सारा आणि पूर्वीची सारा यांच्यात जमीन आस्मानाचा फरक होता. पूर्वी ती खूप लठ्ठ होती, तिचं वजनही नव्वदच्यावर होते. मात्र प्रबळ इच्छाशक्ती आणि मेहनतीच्या जोरावर साराने अशक्य ते शक्य करून दाखवले.
फॅट टू फिट होण्याची साराची कथा तितकीच रंजक आहे. सुरूवातीला साराचं वजन 96 किलो इतके होते. हे पाहून साराला अक्षरक्षा रडू कोसळले होते. यावेळी आपल्याला अभिनेत्री बनायचे आहे अशी इच्छाही तिने आई अमृता सिंहकडे व्यक्त केली होती. त्यावेळी अमृता सिंह म्हणजे साराच्या आईने तिला वजन कमी करण्याचा सल्ला दिला. शिक्षण लवकर पूर्ण करून तिला अभिनेत्री व्हायचं होतं म्हणून पदवीच्या दोन वर्षाचं शिक्षण तिने एका वर्षात पूर्ण केलं. त्याच दरम्यान ती अमेरिकेला गेला होती.
अमेरिकेत काय काय केलं याची कथा तिने एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले. अमेरिका असं ठिकाण आहे जिथे तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, खाऊ शकता. कारण तिथे विविध चॉईस असतात असं सारानं सांगितलं. चॉकलेटसह तिथे सॅलड मिळते आणि पिझ्झासह प्रोटीनही मिळते.
या सगळ्यांमुळेच ती अमेरिकेत असताना वाढलेले वजन कमी केले. याशिवाय वर्कआऊट आणि जीवनातील काही गोष्टी शिस्तीने फॉलो केल्याचे साराने सांगितले आहे. या सगळ्या कालावधीत आपण आपल्या आईशी म्हणजे अमृता सिंह हिच्याशी संपर्क साधला नव्हता असंही तिने आवर्जून सांगितले. मात्र शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतून भारतात आली तोवर तिने आपला फोटोसुद्धा आईला दाखवला नव्हता असं साराने म्हटले आहे.
विमानतळावर येताच आईने आपल्या सूटकेसमुळे ओळखल्याचे साराने सांगितले. तीस किलो वजन कमी केल्याप्रमाणे आपण वेगळेच दिसत होतो असं साराने सांगितले. PCOD म्हणजे पॉलिसिस्टीक ओवेरियल सिंड्रोम या आजाराने सारा त्रस्त आहे. या आजारामुळे महिलांचे वजन वाढते. हार्मोनल समस्यांमुळे आजार होत असून तो महिलांमध्ये विशेषतः लहान वयातील मुलींमध्ये होतो.