शाहिद कपूरच्या बायकोला 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' कसा वाटला, मीरा स्पष्टच म्हणाली...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2024 10:35 AM2024-02-09T10:35:16+5:302024-02-09T10:38:54+5:30
शाहिद - क्रितीचा 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' पाहून शाहिदची पत्नी मीराने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे (Teri Baton Mein Aisa Uljha Jiya)
शाहिद कपूरचा (Shahid Kapoor) 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' सिनेमा आज रिलीज झालाय. सिनेमातील गाणी, हटके कथानक अन् हलक्याफुलक्या विनोदांमुळे शाहिद - क्रितीच्या सिनेमाची उत्सुकता शिगेला होती. काल मुंबईत या सिनेमाचा ((Teri Baaton Mein Aisa Uljha Jiya) शानदार प्रिमियर सोहळा पार पडला. या सोहळ्यात शाहिदची पत्नी मीराला (Mira Rajput) सिनेमाबद्दल विचारण्यात आलं. तेव्हा मीराने दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आहे.
'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' सिनेमा पाहिल्यावर मीराने इन्स्टाग्रामवर तिची प्रतिक्रिया दिली आहे. सिनेमाच्या संपूर्ण टीमला शुभेच्छा देताना मीरा म्हणाली, "मी हसून लोटपोट झाले. खुप दिवसांनी इतका मनोरंजनात्मक सिनेमा पाहण्यात आला. प्रेम, हास्य, मस्ती, डान्स आणि हृदयावर घर करणारा एक संदेश सिनेमातून पाहायला मिळतो. क्रिती सेनन तिच्या भूमिकेत एकदम परफेक्ट आहे."
शाहिदच्या अभिनयाबद्दल बोलताना मीराने प्रतिक्रिया दिली की, "शाहिद तुझ्यासारखा दुसरा कोणी नाही. तू खरा OG लव्हर बॉय आहेस. मी तुझ्या पुन्हा प्रेमात पडलेय. मी खूप दिवसांनी चित्रपटगृहात मनापासून हसल्याने माझं पोट दुखतंय." अशाप्रकारे मीराने सिनेमाचं तोंडभरुन कौतुक केलंय. 'तेरी बातो में ऐसा उलझा जिया' सिनेमा आज रिलीज झाला असून शाहिद - क्रिती सेनन - धर्मेेंद्र - डिंपल कपाडिया सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.