असे शूट झाले होते 'जिस्म'मधील जॉन अब्राहम-बिपाशा बासूमधील इंटिमेट सीन, पूजा भटने केला खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2021 05:25 PM2021-04-19T17:25:22+5:302021-04-19T17:25:50+5:30
'जिस्म' चित्रपटाची जॉन अब्राहम आणि बिपाशा बासूच्या इंटिमेट सीन्समुळे खूप चर्चा झाली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन पूजा भटने केले होते.
हॉलिवूडमध्ये मीटू मुव्हमेंटनंतर कित्येक इंटरनॅशनल प्रोजेक्ट्समध्ये इंटीमेसी कोऑर्डिनेटर मिळाले. इंटिमेसी कोऑर्डिनेटर नेहमी चित्रपटातील इंटिमेट सीन कोरिओग्राफ करतात. मात्र, बॉलिवूडमध्ये हॉलिवूडसारखे आता इंटिमेसी कोऑर्डिनेटरची अंमलबजावणी झाली नाही. नुकतेच निर्माती, दिग्दर्शिका आणि अभिनेत्री पूजा भटने बीबीसीला खुलासा केला की कशी ती तिच्या चित्रपटासाठी इंटिमेसी कोऑर्डिनेटर बनली होती. ही गोष्ट त्यावेळची आहे जेव्हा सिनेइंडस्ट्रीत इंटिमेसी कोऑर्डिनेटर हा शब्द जराही प्रचलित नव्हता.
बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत पूजा भटने त्या गोष्टीचा उल्लेख केला जेव्हा ती जिस्म चित्रपटाचे दिग्दर्शन करत होती. त्यावेळी ती निर्मातीसोबतच इंटिमेसी कोऑर्डिनेटरची भूमिका केली होती. या चित्रपटात बिपाशा बासू आणि जॉन अब्राहम मुख्य भूमिका साकारली होती.
इंटीमेसी कोऑर्डिनेटर होण्यासोबत तिचा एकच हेतू होता की बिपाशा इंटिमेट सीनदरम्यान कम्फर्टेबल आहे की नाही हे पहायचे. एका मुलाखतीत पूजाने सांगितले की, बिपाशाला सेटवर अनकम्फर्टेबल वाटल नाही पाहिजे, यासाठी मी तिच्यासाठी असा एक क्रू तयार केला होता. जेव्हा २००२ साली मी जिस्म चित्रपट बनवत होती तेव्हा मी एक महिला आणि अभिनेत्री असण्याच्या नात्याने बिपाशाला एक सल्ला दिली होती की मी तूला असे करायला नाही सांगणार ज्यात तू कम्फर्टेबल नसशील.
पूजा भट पुढे म्हणाली की, मी तुम्हाला सांगू इच्छिते की चित्रपटात असेच काही नव्हते, बिपाशाला जॉनला आकर्षित करायचे होते. मी त्यांना सांगितले की, सीन कन्विसिंग असला पाहिजे. तू सीनमध्ये अनकंम्फर्टेबल दिसली नाही पाहिजे, मात्र तुला निर्णय घ्यायचा आहे की पुढे किती चांगले करायचे आहे.
पूजा भट नुकतीच नेटफ्लिक्सवर बॉम्बे बेगम सीरिजमध्ये झळकली होती. यात तिने इंटिमेट सीन दिले होते. त्याच्या अनुभवाबद्दल पूजाने सांगितले की, सेटवर इंटीमेसी कोऑर्डिनेटर नव्हता पण माझी दिग्दर्शिक अलंकृता श्रीवास्तवने मला खूप कम्फर्टेबल केले होते.