Timepass 3 Box Office Collection: दगडू आणि पालवीच्या ‘टाईमपास 3’ने दोन दिवसांत किती केली कमाई? 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2022 04:30 PM2022-07-31T16:30:01+5:302022-07-31T16:31:41+5:30

Timepass 3 : 400 स्क्रिन्स आणि 10000 शोजसह ‘टाईमपास 3’ प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट काय जादू दाखवणार, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर त्याचे आकडे आले आहेत.

How much did Dagdu and Palvi's 'Timepass 3' earn in two days? | Timepass 3 Box Office Collection: दगडू आणि पालवीच्या ‘टाईमपास 3’ने दोन दिवसांत किती केली कमाई? 

Timepass 3 Box Office Collection: दगडू आणि पालवीच्या ‘टाईमपास 3’ने दोन दिवसांत किती केली कमाई? 

googlenewsNext

Timepass 3 Box Office Collection: दीर्घकाळापासून एका मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा होती.  यामधील गाणी, डायलॉगनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला होता. हा चित्रपट कोणता तर ‘टाईमपास 3’. अभिनेत्री हृता दुगुर्ळे आणि अभिनेता प्रथमेश परब या धम्माल जोडीचा हा चित्रपट कधी एकदा प्रदर्शित होतो, असं चाहत्यांना झालं होतं. अखेर शुक्रवारी 28 जुलैला हा चित्रपट चित्रपटगृहांत धडकला.

रवी जाधव यांनी दिग्दर्शित केलेला हा सिनेमा 400 स्क्रिन्स आणि 10000 शोजसह प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. पहिल्या दिवशी हा चित्रपट काय जादू दाखवणार, हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सुक असाल तर त्याचे आकडे आले आहेत.

 या चित्रपटाला चित्रपटगृहांत प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसतोय. काही प्रेक्षकांना चित्रपट भलताच आवडला आहे तर काहींनी चित्रपटात काहीच नाविण्य नसल्याचं म्हणत आहे. कमाईचं म्हणाल तर गेल्या दोन दिवसांत या चित्रपटाने कोटींचा टप्पा गाठला आहे. 

रिलीजनंतरच्या दोन दिवसात एक कोटीहून अधिक कमाई केली आहे. पहिल्या दिवशी चित्रपटाने 80 लाखांची कमाई केली.  तर दुस-या दिवशी शनिवारी कमाईत वाढ पाहायला मिळाली. दुस-या दिवशी या चित्रपटाने 1 कोटी 10 कोटींचा बिझनेस केला. म्हणजेच दोन दिवसांत या चित्रपटाने एकूण 1 कोटी 90 लाखांचा गल्ला जमवला. रविवारी या आकड्यात वाढ होईल अशी अपेक्षा आहे. 

10 कोटी खर्चून बनलेल्या ‘टाईमपास 3’ या चित्रपटात हृताने पालवीची हटके भूमिका साकारली आहे. प्रेक्षकांचा लाडका दगडूची आणि पालवीची केमिस्ट्री या चित्रपटात पाहायला मिळतेय.

Web Title: How much did Dagdu and Palvi's 'Timepass 3' earn in two days?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.