अबब! पुष्पा-२ साठी अल्लू अर्जुन 'इतकं' मानधन घेणार? समोर आला मोठ्ठा आकडा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2022 11:43 AM2022-01-31T11:43:38+5:302022-01-31T11:46:14+5:30

पुष्पा चित्रपटाला प्रचंड यश; बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई

how much fees allu arjun taking for pushpa 2 movie | अबब! पुष्पा-२ साठी अल्लू अर्जुन 'इतकं' मानधन घेणार? समोर आला मोठ्ठा आकडा

अबब! पुष्पा-२ साठी अल्लू अर्जुन 'इतकं' मानधन घेणार? समोर आला मोठ्ठा आकडा

googlenewsNext

पुष्पा नाम सुन के फ्लॉवर समझा क्या, फायर है में... पुष्पा-द राईजमधला हा डायलॉग आता प्रत्येकाच्या तोंडी आहे. श्रीवल्ली गाणं सुपरहिट ठरलंय. त्या गाण्यातली अल्लू अर्जुनची स्टेप सोशल मीडियावर धुमाकूळ घालतेय. पुष्पा-द राईज चित्रपटातील अल्लू अर्जुनची भूमिका प्रचंड गाजतेय. त्याचा फायदा अल्लूला पुष्पाच्या पुढच्या भागात होणार आहे. पुष्पा-द राईज सिनेमाचा शेवट उत्कंठावर्धक होता. त्यामुळे आता चाहते पुष्पा-२ ची वाट पाहताहेत.

अल्लू अर्जुनला एका चित्रपटासाठी साधारणत: १० कोटी रुपये मानधन मिळतं. पुष्पा-द राईजसाठी त्यानं ५० कोटी रुपये मानधन घेतलं. पुष्पा चित्रपट प्रचंड हिट झाला. त्याचं हिंदी व्हर्जनदेखील हिट ठरलं. आता या यशाचा मोठा फायदा अल्लूला पुष्पा-२ मध्ये होणार आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अल्लू पुष्पा-द रूल (पुष्पाचा दुसरा भाग) १०० कोटी रुपये मानधन घेणार असल्याची चर्चा आहे.

पुष्पाच्या बंपर यशामुळे अल्लू अर्जुननं दक्षिणेतल्या अनेक कलाकारांना मागे टाकलं आहे. ज्युनियर एनटीआर दक्षिणेतला प्रख्यात अभिनेता. त्याचा RRR चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यासाठी त्यानं ४५ कोटी रुपये घेतले आहेत. याच चित्रपटात दिसणारा राम चरण तेजा ५० कोटी मानधन घेणार आहे. मार्च किंवा एप्रिलमध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येऊ शकतो.

बाहुबली प्रभासदेखील इतर अभिनेत्यांपेक्षा जास्त मानधन घेतो. एका चित्रपटासाठी १०० कोटी रुपये मानधन घेणारा प्रभास संदीप रेड्डी वांगाच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे. त्यासाठी त्यानं १५० कोटी रुपये मानधन घेणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: how much fees allu arjun taking for pushpa 2 movie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.