आता करण जोहरशी कसे वागणार?

By Admin | Published: January 24, 2016 01:07 AM2016-01-24T01:07:51+5:302016-01-24T01:07:51+5:30

जयपूर फेस्टिव्हलमध्ये करण जोहरने जे काही म्हटले त्याला ना योग्य म्हणता येऊ शकते ना अयोग्य म्हणून फेटाळता येऊ शकते. करण जोहरने दोन मुद्दे प्रामुख्याने मांडले. त्यातील एक अभिव्यक्ती

How will Karan do this with Johar? | आता करण जोहरशी कसे वागणार?

आता करण जोहरशी कसे वागणार?

googlenewsNext

(संडे स्पेशल)
- अनुज अलंकार

जयपूर फेस्टिव्हलमध्ये करण जोहरने जे काही म्हटले त्याला ना योग्य म्हणता येऊ शकते ना अयोग्य म्हणून फेटाळता येऊ शकते. करण जोहरने दोन मुद्दे प्रामुख्याने मांडले. त्यातील एक अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि दहशतीबाबत होता, तर दुसरा देशातील लोकशाहीबाबतचा होता. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर गेल्या काही काळापासून देशात सातत्याने चर्चा होत आहे.
आमीर खान आणि शाहरूख खानपासून देशातील इतर अनेक मान्यवरांनी देशात असहिष्णुता वाढीला लागल्याचे मत मांडले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य असल्यामुळे त्यांनी मत मांडण्यात गैर नाही. मात्र, सरकारी यंत्रणेशी संबंधित राजकीय पक्ष व संघटनांच्या कट्टरवाद्यांनी या मुद्द्यावर चर्चा करण्याऐवजी असहिष्णुतेबाबत बोलणाऱ्यांनाच जोरदार विरोध दर्शविला. आता करण जोहरही अशाच प्रकारची भूमिका मांडत असतील तर त्यात नवे असे काही नाही. मात्र, आमीर खान आणि शाहरूख खानवर तुटून पडलेल्या संघटना आणि सत्ताधारी नेत्यांना करण जोहरचे म्हणणे किती कटू वाटते हे पाहणे निश्चितच रंजक ठरेल. सहिष्णुतेच्या ठेकेदारांनी आमीर खान आणि शाहरूख खान यांच्यावर ज्या पद्धतीने टीकास्त्र सोडले अगदी त्याच पद्धतीने ते आता करण जोहर यांच्यावर हल्ला करतील काय, असा प्रश्न आहे. जर असे झाले नाही तर हे स्पष्ट होईल की, शाहरूख खान आणि आमीर खानच्या विरोधाचा मुद्दा सहिष्णुतेपेक्षा पंतप्रधानांच्या धर्माच्या आधारावर आवडत्या व नावडत्या व्यक्तींशी संबंधित होता.

Web Title: How will Karan do this with Johar?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.