१२ ऑगस्टला हृतिक-अक्षयचं 'सिनेमा वॉर'
By Admin | Published: July 20, 2016 08:09 PM2016-07-20T20:09:34+5:302016-07-20T20:30:18+5:30
अक्षय कुमारचा रुस्तम आणि हृतिक रोशनचा मोहन जोदडो यांच्यादरम्यान १२ ऑगस्ट रोजी जोरदार टक्कर होणार आहे. यंदा बॉक्स ऑफिसवर वर्षातील सगळ्यात मोठ्ठं 'सिनेमा वॉर' पाहायला मिळणार आहे
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २० : अक्षय कुमारचा रुस्तम आणि हृतिक रोशनचा मोहन जोदडो यांच्यादरम्यान १२ ऑगस्ट रोजी जोरदार टक्कर होणार आहे. यंदा बॉक्स ऑफिसवर वर्षातील सगळ्यात मोठ्ठं 'सिनेमा वॉर' पाहायला मिळणार आहे. आशुतोष गोवारिकर दिग्दर्शित आणि हृतिक रोशन स्टारर महत्त्वाकांक्षी असा 'मोहन्जोदारो' आणि अक्षय कुमारचा मच अवेटेड 'रुस्तम' हे दोन्हीही सिनेमे एकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत. यामुळे बॉक्स ऑफिसवर तगडी स्पर्धा पहायला मिळणार आहे.
आशुतोषला आपल्या सिनेमावर पूर्ण विश्वास असून त्याने १२ तारखेलाच आपला सिनेमा प्रदर्शित करण्याचा हट्ट धरला आहे. त्यामुळे खिलाडी कुमार समोर क्रिश हार मानतो का? हे बघणं उत्सुकतेचं ठरणार आहे. अक्षयच्या एअरलिफ्ट, हाऊसफुल ३ सारख्या चित्रपटाने १०० कोटींचा आकडा पार केला आहे. याउलट ह्रतिक रोशनचा शेवटचा चित्रपट कधी आला होता हे प्रेषकही विसरले असतील. बँग बँग नंतर त्याचा एकही चित्रपट प्रदर्शित झाला नाही. या काळामध्ये अक्षयचे ५-६ चित्रपट हीट झाले आहेत.
रुस्तम चित्रपट टिनु सुरेश देसाई दिग्दर्शित करीत असून, अक्षय कुमार याने नौसेना अधिकारी रुस्तम पावरीची भूमिका केली आहे. आपल्या पत्नीच्या प्रियकराचा खून करणाऱ्या के. एम. नानावटी यांच्यावर आधारित हा चित्रपट आहे. यामध्ये इलिना डीक्रुझ आणि इशा गुप्ता यांच्याही भूमिका आहेत..
ह्रतिक सोबत नवखी पुजा हेगडे आहे. पाहुयात प्रेषक कोणाला पसंती दर्शवतात. यापुर्वी, अजय देवगण आणि शाहरुख खान आमने सामने आले होते. मात्र, आता आशुतोष गोवारिकर आपल्या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची शक्यता कमीच आहे.
दरम्यान, 'रुस्तम'चा ट्रेलर सोशल साईट्सवर हिट झाला आहे. तसेच अक्षय कुमारचे सध्या सगळेच सिनेमे बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करताना दिसतायत. त्यामुळे आशुतोष गोवारीकरच्या शुभचिंतकांनी त्याला त्याच्या सिनेमाची प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याचा सल्ला दिला असेल.