हृतिकला नकार देऊच शकले नाही!

By Admin | Published: February 6, 2017 03:54 AM2017-02-06T03:54:40+5:302017-02-06T03:54:40+5:30

हृतिक रोशन याच्या ‘काबिल’ या सिनेमातील एका गाण्यात झळकलेली अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे म्हणणे आहे की, या गाण्यासाठी मी हृतिकला नकार देऊच शकले नाही

Hrithik could not refuse! | हृतिकला नकार देऊच शकले नाही!

हृतिकला नकार देऊच शकले नाही!

googlenewsNext

tyle="text-align: justify;">हृतिक रोशन याच्या ‘काबिल’ या सिनेमातील एका गाण्यात झळकलेली अभिनेत्री उर्वशी रौतेलाचे म्हणणे आहे की, या गाण्यासाठी मी हृतिकला नकार देऊच शकले नाही. उर्वशी सिनेमातील ‘सारा जमाना’ या जुन्या गाण्याच्या रिमिक्समध्ये बघावयास मिळते. हे गाणे १९८१ मध्ये ‘याराना’ या सिनेमात अमिताभ बच्चनसोबत चित्रित करण्यात आले आहे.

उर्वशीने न्यूज एजंसी पीटीआयशी बोलताना सांगितले की, मी एक अभिनेत्री आहे अन् मला बऱ्याचशा सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारायच्या आहेत. त्यामुळेच मला हे गाणे करायचे होते, कारण मी हृतिकला नकार देऊच शकत नाही. २०१५ मध्ये मिस यूनिव्हर्स स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व केलेल्या उर्वशीने बॉलिवूड करिअरच्या यशाचे श्रेय मॉडलिंगला दिले आहे. ती म्हणते की, मॉडलिंगमुळेच माझ्यात आत्मविश्वास आला आहे. आज मी जे काही आहे ते मॉडलिंगमुळेच आहे. उर्वशीने ‘ग्रेट ग्रॅण्ड मस्ती, सनम रे आणि सिंग साब द ग्रेट’ या सिनेमांमध्ये काम केले आहे.

गेल्या गुरुवारी डिझायनर शैलेश सिंघानिया याच्या लॅक्मे फॅशन वीकमध्ये सहभागी झालेल्या उर्वशीला जेव्हा ‘काबिल’विषयी विचारण्यात आले तेव्हा तिने ही प्रतिक्रिया व्यक्त केली. दरम्यान, ‘काबिल’मधील उर्वशीचे हे गाणे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. याविषयी सांगताना उर्वशी म्हणाली की, हृतिकच्या सिनेमात काम करायला मिळाल्याने मी आनंदी आहे. हृतिक हा इंडस्ट्रीमधील खूप मोठा स्टार असून, त्याच्यासोबत काम करण्याची संधी मिळणे हे नशीबच म्हणावे लागेल, असेही तिने सांगितले.
उर्वशीला बॉलिवूडमध्ये एक कलाकार यापेक्षा मॉडेल म्हणूनच ओळखले जाते. मॉडलिंग जगतात तिने स्वत:चा ठसा उमटविला असून, आता ती बॉलिवूडमध्ये करिअर करण्यास उत्सुक आहे. त्यासाठी ती संधीच्या शोधात असल्याचे समजते.

Web Title: Hrithik could not refuse!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.