हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ला कायदेशीर नोटिस! वायुसेनेच्या युनिफॉर्ममध्ये 'ती' गोष्ट करणं भोवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2024 12:59 PM2024-02-06T12:59:04+5:302024-02-06T13:06:14+5:30

हृतिक रोशन - दीपिका पादुकोणच्या 'फायटर' सिनेमाला कायदेशीर नोटिस मिळाल्याची धक्कादायक गोष्ट समोर येतेय

Hrithik roshan - Deepika padukone's 'Fighter' legal notice act in Air Force uniform sparks controversy | हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ला कायदेशीर नोटिस! वायुसेनेच्या युनिफॉर्ममध्ये 'ती' गोष्ट करणं भोवलं

हृतिक-दीपिकाच्या 'फायटर'ला कायदेशीर नोटिस! वायुसेनेच्या युनिफॉर्ममध्ये 'ती' गोष्ट करणं भोवलं

हृतिक रोशन (Hrithik Roshan) - दीपिका पादुकोण (Deepika Padukon) यांच्या 'फायटर'सिनेमाने बॉक्स ऑफीसवर चांगली कामगिरी केली. 'फायटर' (Fighter) अजुनही थिएटरमध्ये हाऊसफुल गर्दीत सुरु आहे. सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित 'फायटर'सिनेमाची अॅक्शनपॅक कथा अन् चित्तथरारक दृश्य लोकांना चांगलीच आवडलेली दिसत आहेत. पण 'फायटर'ला कायदेशीर नोटिस मिळाल्याची बातमी समोर येतेय. वायुसेनेच्या युनिफॉर्ममध्ये हृतिक - दीपिकाने किसिंग सीन केल्याने 'फायटर'ला कायदेशीर नोटिस मिळाली आहे.

इंडियन एअर फोर्समधील विंग कमांडर सौम्या दीप दास यांनी 'फायटर'ला कायदेशीर नोटिस बजावली आहे. इंडियन एअर फोर्सची बदनामी आणि अपमान केल्याप्रकरणी विंग कमांडर सौम्या यांनी ही नोटिस बजावली आहे. नोटिसमध्ये लिहिण्यात आलंय की, "इंडियन एअर फोर्सचा युनिफॉर्म हा केवळ एक कपडा नाहीय तर राष्ट्रीय सुरक्षा आणि कर्तव्यासाठी तत्पर असलेला तो एक आदरणीय गणवेष आहे. रनवेवर किसिंग करणं हे वायुसेनेच्या अधिकाऱ्याला शोभणारं वर्तन नाही. वायुसेनेची शिस्त आणि मानमरातब अशा गोष्टींच्या विरुद्ध हा प्रसंग आहे."

कायदेशीर नोटिसमध्ये पुढे लिहिण्यात आलंय की, "वायुसेनेचा गणवेश हा एक आदर्श आहे. याशिवाय राष्ट्रीय सुरक्षा, शिस्त आणि त्यागाचं प्रतीक आहे.  या गणवेशाचा रोमँटिक सीनसाठी वापर करणं चुकीचं आहे. वायुसेनेचा आदर, तत्व आणि देशासाठी समर्पण अशा सर्व गोष्टींचा यामुळे अनादर होतोय. सीमेवर जे देशाचं संरक्षण करतात त्या अधिकाऱ्यांच्या तत्वांना आणि त्यागाला हा प्रसंग छेद देतो." असं या नोटिसमध्ये सांगण्यात आलंय. दरम्यान 'फायटर'च्या टिमने या नोटिसला अजून कोणतंही उत्तर दिलं नाहीय. 'फायटर'प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला २५ जानेवारीला थिएटरमध्ये रिलीज झाला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर ३०० कोटींपेक्षा जास्त कमाई केलीय.

Web Title: Hrithik roshan - Deepika padukone's 'Fighter' legal notice act in Air Force uniform sparks controversy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.