घटस्फोटानंतरही Ex husband ऋतिक रोशनसोबत कसे आहे पत्नी सुझैनचे नातं ?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2019 09:00 PM2019-05-03T21:00:00+5:302019-05-03T21:00:00+5:30

सुझैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन 2000मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. 2014मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपले रस्ते वेगळे केले.

Hrithik roshan ex wife sussanne khan opens up about her relationship with him | घटस्फोटानंतरही Ex husband ऋतिक रोशनसोबत कसे आहे पत्नी सुझैनचे नातं ?

घटस्फोटानंतरही Ex husband ऋतिक रोशनसोबत कसे आहे पत्नी सुझैनचे नातं ?

googlenewsNext
ठळक मुद्देसुझैन म्हणाली होती की, ऋतिक माझा सपोर्ट सिस्टम आहे. ऋतिक रोशन 'सुपर 30' लवकरच रिलीज होणार आहे.

सुझैन खान आणि अभिनेता ऋतिक रोशन 2000मध्ये विवाहच्या बंधनात अडकले होते. 2014मध्ये दोघांनी घटस्फोट घेत आपले रस्ते वेगळे केले. मात्र घटस्फोट झाल्यानंतर ही दोघांमध्ये मैत्रीचे नातं कायम राहिले. दोघांना अनेक वेळा व्हॅकेशनवर आणि बर्थ डे पार्टीमध्ये एकत्र स्पॉट करण्यात आले. एक मुलाखती दरम्यान सुझैनने ऋतिक आणि तिच्यामध्ये चांगले बॉन्डिंग असल्याचे सांगितले होते.  

बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखती दरम्यान सुझैन म्हणाली होती की, ''आम्ही कपल नसलो तर आमच्यामध्ये मैत्रीचे नातं आजही कायम आहे. ऋतिक माझा सपोर्ट सिस्टम आहे. आम्ही एकत्र राहत नसलो तरी एकमेकांसाठी नेहमीच मदतीला उभे येतो.''      

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर, 'सुपर 30' लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमात ऋतिक रोशन एका शिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे, जो 30 हुशार मुलांना आयआयटीमध्ये प्रवेश परिक्षेसाठी तयार करतो. सुपर 30’ हा सिनेमा गणितज्ज्ञ आनंद कुमार यांच्या आयुष्यावर आधारित आहे. आपला पूर्ण वेळ तो विद्यार्थ्यांसोबत असायचा. आनंद कुमार बिहारमध्ये सुपर 30 नावाचा एक उपक्रम चालवतात. या उपक्रमातंर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे.जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात.

Web Title: Hrithik roshan ex wife sussanne khan opens up about her relationship with him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.