घटस्फोटाच्या चार वर्षांनंतर हृतिक रोशनने सुजैनसाठी लिहिली भावूक पोस्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 09:50 AM2018-11-26T09:50:22+5:302018-11-26T09:53:03+5:30
हृतिक रोशन व सुजैन खान चार वर्षांपूर्वी कायदेशीर घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे झालेत. पण त्यांची मैत्री आजही कायम आहे.
ठळक मुद्दे एकेकाळी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी हे एक कपल होते. पण अचानक या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१४ मध्ये कायदेशीर घटस्फोट घेत हा निर्णय अमलातही आणला. मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमीही आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण काही दिवसांपूर्वी सुजैन खानचे डॅड संजय खान यावर बोलले होते.
हृतिक रोशन व सुजैन खान चार वर्षांपूर्वी कायदेशीर घटस्फोट घेऊन एकमेकांपासून वेगळे झालेत. पण त्यांची मैत्री आजही कायम आहे. हृतिक व सुजैन आपल्या मुलांसोबत सर्रास एकत्र फिरताना दिसतात. अलीकडे हृतिकने सुजैनसाठी एक खास पोस्ट लिहिली. या पोस्टवरून एकच गोष्ट सिद्ध होते, ते म्हणजे विचार, मतभेद असू शकतात. पण यानंतरही एकत्र येणे शक्य आहे. खुद्द हृतिकनेही आपल्या पोस्टमध्ये हेच लिहिले आहे.
सुजैनचा एक फोटो शेअर करत हृतिकने लिहिले की, येथे माझी सर्वात जवळची मैत्रिण (माझी पूर्वाश्रमीची पत्नी) सुजैन आहे. जी माझ्या आणि मुलांच्या आयुष्यातील आनंदाचे क्षण कॅमेºयात टिपते आहे. हा सुद्धा एक खास क्षण आहे. पुढे त्याने लिहिलेय, ही आमच्या मुलांसाठी एक शिकवण आहे की, एक जगात मत-मतांतरे असू शकतात. पण यानंतरही एकत्र येणे शक्य आहे. व्यक्ति म्हणून तुम्ही भिन्न असालही पण तरिही अभिन्न राहू शकता. येथे एक आणखी एकजूट, साहसी, मुक्त आणि प्रेमळ जग आहे.
एकेकाळी बॉलिवूडच्या बेस्ट कपलपैकी हे एक कपल होते. पण अचानक या दोघांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि २०१४ मध्ये कायदेशीर घटस्फोट घेत हा निर्णय अमलातही आणला. अर्थात घटस्फोटानंतरही हृतिक व सुजैन आपल्या मुलांसोबत कधी एकत्र सुट्टी घालवताना तर कधी मुव्ही डेट वा डिनर डेट एन्जॉय करताना दिसलेत. मध्यंतरी हृतिक व सुजैन पुन्हा लग्न करणार, अशी बातमीही आली. या बातमीवर हृतिक व सुजैन अद्याप काहीही बोललेले नाहीत. पण काही दिवसांपूर्वी सुजैन खानचे डॅड संजय खान यावर बोलले होते. हृतिक व सुजैन पुन्हा एकत्र यावेत, अशी मनातील इच्छा त्यांनी बोलून दाखवली होती.