इस्तंबुल विमानतळावरील बॉम्बस्फोटातून सुदैवाने बचावला हृतिक

By Admin | Published: June 29, 2016 11:32 AM2016-06-29T11:32:51+5:302016-06-29T11:32:51+5:30

इस्तंबुल विमानतळावर आत्मघातकी बॉम्बस्फोट होण्याच्या काही तास आधी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या दोन मुलांसोबत विमातळावर उपस्थित होता.

Hrithik saved luck from airport bomb blast | इस्तंबुल विमानतळावरील बॉम्बस्फोटातून सुदैवाने बचावला हृतिक

इस्तंबुल विमानतळावरील बॉम्बस्फोटातून सुदैवाने बचावला हृतिक

googlenewsNext

tyle="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
अंकारा, दि. २९ - इस्तंबुल विमानतळावर आत्मघातकी बॉम्बस्फोट होण्याच्या काही तास आधी बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन त्याच्या दोन मुलांसोबत विमातळावर उपस्थित होता. स्वत: हृतिकने टि्वट करुन ही माहिती दिली आहे. हृतिक आणि त्याच्या मुलांचे इस्तंबुलहून एक कनेक्टींग फ्लाईट चुकले. 
 
त्यांना बिझनेस क्लासचे तिकीट हवे होते पण ते न मिळाल्याने त्यांना विमानतळावरच थांबून रहावे लागले. त्यानंतर हृतिकने विमानतळावरील कर्मचा-यांच्या मदतीने दुस-या विमानाचे बुकिंग केले व दुस-या ठिकाणी निघून गेला. 
 
 
आणखी वाचा 
इस्तंबुल विमानतळ स्फोटांनी हादरले, 36 जणांचा मृत्यू, 147हून अधिक जखमी
टर्की मधल्या भारतीयांसाठी इर्मजन्सी नंबर
हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानने 1.87 कोटींना फसवले
 
ऐनवेळी विमान तिकीटाच्या बुकिंगसाठी केलेल्या मदतीबद्दल हृतिकने विमानतळावरील कर्मचा-यांचे कौतुक केले आहे. धर्मासाठी निरपराधांचा बळी घेतला आपण दहशतवादाविरोधात सर्वांनी एकत्र राहून लढले पाहिजे असे हृतिकने टि्वटमध्ये म्हटले आहे. इस्तंबुल विमानतळावर आत्मघातकी दहशतवाद्यांनी दोन बॉम्बस्फोट घडवले. यात ३६ नागरीकांचा बळी गेला तर, शंभरपेक्षा जास्त नागरीक जखमी झाले. 
 
 
 

Web Title: Hrithik saved luck from airport bomb blast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.