वारंवार पाहिला जातोय हृतिक रोशनचा हा व्हिडीओ, पाहून चाहत्यांचे सोडा सेलिब्रेटीही झाले आवाक्
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 04:43 PM2021-07-13T16:43:07+5:302021-07-13T16:48:02+5:30
हृतिक रोशनच्या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. वारंवार त्याचा हा व्हिडीओ पाहिला जात आहे.
कलाकार मंडळी कायम त्यांच्या कामातच बिझी असतात. मात्र आपल्या आवडत्या गोष्टींसाठी बिझी शेड्युअलमधून वेळ काढत कला जोपासतानाही दिसतात.
याचीच प्रचिती देणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला आहे. व्हिडीओ पाहून त्याचे सारेच कौतुक करताना दिसत आहे. हृतिक रोशनच्या व्हिडीओने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. वारंवार त्याचा हा व्हिडीओ पाहिला जात आहे.
हृतिक रोशनच्या व्हिडीओने सोशल मीडियावर चाहत्यांची चांगलीच मनं जिंकली आहेत. एरव्ही तो सोशल मीडियावर त्याच्या खास क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ आपल्या फॅन्ससह शेअर करत असतो. चाहत्यांची वाहवा मिळवताना दिसतो. मात्र त्याचा हा नवीन व्हिडीओ पाहून चाहते मात्र चांगलेच आवाक् झाले आहेत. हृतिकचा ‘सुपर 30’ सिनेमाच्या शूट दरम्यानचा हा व्हिडीओ आहे. व्हिडीओत हृतिक सुपरहिट ‘कोई मिल गया’ सिनेमातंल गाणं गात आहे.
आतापर्यंत अभिनय आणि डान्सिंगने चाहत्यांना याड लावणा-या हृतिक रोशनची दडलेली कला जगासमोर आलीय. होय, व्हिडीओत हृतिक खास स्टाइलमध्ये गाणं गाताना दिसत आहे. नुसते चाहतेच नाही तर अनेक सेलिब्रिटींनीही हृतिकचं कौतुक केलं आहे. हृतिक रोशन अभिनयासह इतर अनेक गोष्टींमध्ये हुशार आणि पारंगत आहे. अभिनयाच्या कौशल्यासह आपल्या अंगभूत कलांनी त्यानं आपलं वेगळेपण जपले आहे.
फिटनेसमध्येही तो भल्याभल्यांना टक्कर देतो. फिटनेसबाबत सजग असलेला हृतिक जिममध्ये घाम गाळत असल्याचे अनेक फोटो त्याच्या सोशल मीडिया पेजवर पाहायला मिळतात. त्याची पिळदार बॉडी कुणालाही घायाळ करेल अशीच आहे. आपल्या फिटनेसच्या दिनचर्येकडे बिल्कुल दुर्लक्ष होऊ देत नाही. रोज 20-30 मिनिटांची कार्डियो एक्सरसाइज करतो.
तो आठवड्यातून 4 दिवस एक्सरसाइज करतो आणि तीन दिवस आराम करतो. हृतिक फिटनेसचा इंटरनॅशनल ट्रेंड आणि वर्कआउट रुटीन फॉलो करतो. यामध्ये तो कार्डियो, स्ट्रेचिंग, पावर वर्कआउट करतो.