क्या बात है! ह्रता दुर्गुळे ठरली पहिली मराठी अभिनेत्री, इन्स्टाग्रामवर गाठला २.४ मिलियन फॉलोव्हर्सचा टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2022 12:54 PM2022-03-11T12:54:18+5:302022-03-11T13:18:23+5:30

आपल्या सौदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृता दुगुर्ळेने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली. सोशल मीडियावर हृताचा मोठा चाहतावर्ग आहे.

Hrta Durgule becomes first Marathi actress to reach 2.4 million followers on Instagram | क्या बात है! ह्रता दुर्गुळे ठरली पहिली मराठी अभिनेत्री, इन्स्टाग्रामवर गाठला २.४ मिलियन फॉलोव्हर्सचा टप्पा

क्या बात है! ह्रता दुर्गुळे ठरली पहिली मराठी अभिनेत्री, इन्स्टाग्रामवर गाठला २.४ मिलियन फॉलोव्हर्सचा टप्पा

googlenewsNext

फुलपाखरु','दुर्वा' आणि आता ' मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. पहिल्या मालिकेपासून हृताने कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला आहे. हृताने तिच्या सौंदर्याच्या जोरावर आज मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मन उडू उडू झालं ही तिची मालिका सध्या झी मराठीवर सुरु आहे. 

आपल्या सौदर्य आणि अभिनयाच्या जोरावर हृता दुगुर्ळेने अल्पावधीच प्रेक्षकांची मनं जिंकली.  महत्वाचे म्हणजे सोशल मीडियावर सक्रीय असणारी हृता नेहमी आपल्या आयुष्याशी संबंधित अनेक गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असते. याच माध्यमातून ती आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.सोशल मीडियावर हृताचा मोठा चाहतावर्ग आहे. ह्रताने आता इन्स्टाग्रामवर 2.4 मिलियन फॉलोवर्सचा टप्पा पार केला आहे. ऐवढे जास्त फॉलोवर्स असणारी ह्रता ही पहिली मराठी अभिनेत्री ठरली आहे. 

ह्रता लवकरच अनन्या या सिनेमात दिसणार आहे. अनन्याच्या रुपात दिसत असून तिच्यातील धाडसीपणा दिसत आहे. या चित्रपटात अनन्याच्या जिद्दीचा, धाडसीपणाचा प्रवास उलगडला जाणार आहे. , हा चित्रपट १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन प्रताप कड यांनी केलं आहे. 

Web Title: Hrta Durgule becomes first Marathi actress to reach 2.4 million followers on Instagram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.