प्रेग्नेंसीवेळीच पती राजीव सेननं माझा विश्वासघात केला, त्याच्या बॅगेत...; पत्नी चारूचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2022 01:46 PM2022-11-01T13:46:18+5:302022-11-01T13:46:38+5:30

चारू असोपानं एका मुलाखतीत राजीव सेनबाबत शॉकिंग खुलासा केला.

Husband Rajeev Sen betrayed me during pregnancy; Disclosure of wife Charu asopa | प्रेग्नेंसीवेळीच पती राजीव सेननं माझा विश्वासघात केला, त्याच्या बॅगेत...; पत्नी चारूचा खुलासा

प्रेग्नेंसीवेळीच पती राजीव सेननं माझा विश्वासघात केला, त्याच्या बॅगेत...; पत्नी चारूचा खुलासा

googlenewsNext

नवी दिल्ली - सेलिब्रिटी कपल राजीव सेन आणि चारू असोपा यांचा संसार तुटण्याच्या मार्गावर आहे. २०१९ मध्ये या दोघांचं लग्न झालं होते. परंतु लग्नाच्या काही दिवसांनंतरच दोघांमध्ये वाद सुरू झाले. या दोघांची एक मुलगी आहे जी सध्या १ वर्षाची झाली. राजीव आणि चारूने मुलीसाठी एकत्र राहण्याचा खूप प्रयत्न केला परंतु इच्छा असूनही दोघांची मने जुळली नाहीत. त्यामुळे ते दोघं आता घटस्फोट घेणार आहेत. सध्या राजीव आणि चारू एकमेकांचे वाभाडे काढत आहेत. 

चारू असोपानं एका मुलाखतीत राजीव सेनबाबत शॉकिंग खुलासा केला. चारूने सांगितले की, राजीवने माझा विश्वासघात केला. त्यावेळी मी प्रेग्नेंट होते. चारूला राजीवच्या बॅगेत असं काही सापडले ज्यामुळे राजीवचा खरा चेहरा समोर आला. राजीवच्या कृत्यामुळे चारूच्या पायाखालची वाळू सरकली. तिने कुटुंबाला राजीवबद्दल सांगितले. चारू राजीववर खूप प्रेम करायची त्यामुळे पतीला आणखी एक संधी दिली. मात्र तरीही मुलगी जियानाच्या जन्मानंतर दोघांच्या नात्यात अनेक चढउतार आले. 

प्रेग्नेंसीवेळी बिकानेरमध्ये काही महिने थांबल्यानंतर मी मुंबईला परतली. राजीव रोज सकाळी जिमसाठी सकाळी ११ वाजता घरातून बाहेर पडायचा. त्यानंतर रात्री ११ ला घरी यायचा. कधी कधी ७, ८, ९ वाजायचे. मी राजीवला याबाबत विचारणा केली असता वारंवार ट्रॅफिक असल्याने वांद्र्यात कॉफी प्यायला जातो. ट्रॅफिक कमी होण्याची वाट पाहतो. मी राजीवच्या बोलण्यावर विश्वास ठेवला असं चारूने म्हटलं. एकदा राजीव मला न सांगताच दिल्लीला गेला. तेव्हा राजीवच्या बॅगेत मला काही तरी मिळालं. त्यानंतर राजीव मला फसवतोय हे जाणवलं. मी राजीवला सुधारण्याची संधी दिली परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. 

अखेरचं गणेश चर्तुर्थीच्या दिवशी पॅचअपवेळी चारूनं सांगितले की, राजीव जसा होता तसाच राहिला. काहीच बदललं नाही. त्यामुळे राजीव स्वत:ला बदलेल असं वाटलं नाही. मी केलेली चूक पुन्हा करणार नाही असं राजीवनं म्हटलं तेव्हा मी जियानामुळे राजीवला संधी दिली. दोघांनी वकिलांना मेसेज करत आम्हाला घटस्फोट घ्यायचा नाही असं सांगितले. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: Husband Rajeev Sen betrayed me during pregnancy; Disclosure of wife Charu asopa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.