‘आय अ‍ॅम बॅक…,’ केदार शिंदेंची नवी पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2022 03:35 PM2022-09-06T15:35:50+5:302022-09-06T15:37:42+5:30

दिग्दर्शक केदार शिंदे लवकरच शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. 

I am back Kedar Shindes new post in discussion earlier said instagram account was hacked | ‘आय अ‍ॅम बॅक…,’ केदार शिंदेंची नवी पोस्ट चर्चेत

‘आय अ‍ॅम बॅक…,’ केदार शिंदेंची नवी पोस्ट चर्चेत

googlenewsNext

दिग्दर्शक केदार शिंदे (Kedar Shinde) लवकरच शाहीर कृष्णराव गणपतराव साबळे म्हणजेच महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे (Shahir Sable) यांच्या जीवनावर आधारित 'महाराष्ट्र शाहीर' हा सिनेमा येणाऱ्या वर्षात प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा बराच चर्चेत आहे. दरम्यान, आपल्या कामात व्यस्त असतानाच सोमवारी रात्री केदार शिंदे यांचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं. यानंतर मंगळवारी दुपारी त्यांनी फेसबुक पोस्टद्वारे याची माहिती दिली. परंतु दोन तासांनंतर त्यांचं अकाऊंट पूर्ववत झालं.

“काल रात्री माझं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक झालं आहे. कामाच्या गडबडीत हा प्रकार अचानकच घडल्याने पोलीस तक्रारी आणि इतर सगळ्या प्रक्रिया सुरू आहेतच. पण जर ह्या दरम्यान तुम्हा कुणालाही माझ्या Instagram account वरून जर कोणत्याही प्रकारचा मेसेज आला किंवा तुमच्याशी कुठल्याही प्रकारे संपर्क करण्यात आला तर कृपया त्याला कुठल्याही प्रकारे रिप्लाय देऊ नका. ज्या वेळी माझं Instagram अकाऊंट पुन्हा माझ्या ताब्यात येईल तेव्हा तुम्हाला मी कळवेनच तोवर काळजी घ्या. धन्यवाद!!,” असं केदार शिंदे म्हणाले.



यानंतर अनेक नेटकऱ्यांनी यावर कमेंटही केलं. परंतु दोन तासांनी त्यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आय अॅम बॅक अशी पोस्ट शेअर करत आपलं अकाऊंट पूर्ववत झाल्याची माहिती दिली.

Web Title: I am back Kedar Shindes new post in discussion earlier said instagram account was hacked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.