‘मैं इंडियन हूं’

By Admin | Published: March 12, 2016 02:28 AM2016-03-12T02:28:31+5:302016-03-12T02:28:31+5:30

अवैध शिकारीसंदर्भातील एका प्रकरणात अभिनेता सलमान खान गुरुवारी जोधपूर न्यायालयात हजर झाला. मी निर्दोष आहे, असे जबाब सलमानने न्यायालयासमक्ष दिला.

'I am Indian' | ‘मैं इंडियन हूं’

‘मैं इंडियन हूं’

googlenewsNext

अवैध शिकारीसंदर्भातील एका प्रकरणात अभिनेता सलमान खान गुरुवारी जोधपूर न्यायालयात हजर झाला. मी निर्दोष आहे, असे जबाब सलमानने न्यायालयासमक्ष दिला. गतवेळेप्रमाणे याही सुनावणीत न्यायाधीशांनी सलमानला जातीबाबत विचारले. यावर ‘मैं इंडियन हूं’ असे उत्तर सलमानने दिले. १९९८ मध्ये ‘हम साथ साथ है’च्या चित्रीकरणादरम्यान अवैध शस्त्रास्त्रांनी काळविटाची शिकार केल्याचा आरोप सलमानवर आहे. या प्रकरणाची कोर्टात सुनावणी झाली. सर्व साक्षीदारांनी तुझ्याविरुद्ध साक्ष दिली आहे, असे न्यायाधीशांनी म्हटल्यावर मी निर्दोष आहे, असे सलमानने सांगितले. एका वृत्तपत्राने या प्रकरणी वाढवून चढवून लिहिले. यानंतर वनविभाग आणि मीडियाच्या दबावामुळे माझ्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला. माझ्याजवळ मी निर्दोष असल्याचे पुरावे आहेत, असेही सलमानने सांगितले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ एप्रिलला होणार आहे.

Web Title: 'I am Indian'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.