नृत्य दिग्दर्शन करताना मी कलावंतच असते...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2016 03:38 AM2016-11-14T03:38:47+5:302016-11-14T03:38:47+5:30

नृत्य म्हणजे मानवी भावनांचा आनंदोत्सव म्हणायला हवा. मर्यादा व समाजाची बंधने तोडल्याचा आनंद व्यक्त करताना आपण कशा हालचाली

I am the master of dance while choreography ... | नृत्य दिग्दर्शन करताना मी कलावंतच असते...

नृत्य दिग्दर्शन करताना मी कलावंतच असते...

googlenewsNext

नृत्य म्हणजे मानवी भावनांचा आनंदोत्सव म्हणायला हवा. मर्यादा व समाजाची बंधने तोडल्याचा आनंद व्यक्त करताना आपण कशा हालचाली करतोय, आपण कसे दिसतोय, याचा विचारच कधी कुणी नृत्य करताना दिसत नाही. मग, तो लग्नात केलेला डान्स असो किंवा पार्टीत. आपल्या अव्यक्त भावनांना व्यक्त करण्याची संधी म्हणजे नृत्य. बॉलिवूडमधील चित्रपटात नृत्य नसण्याची कल्पना करताच येत नाही, अनेक दिग्गज नर्तकांनी आपला नृत्याविष्कार चित्रपटात सादर केला आहे. बॉलिवूडमधील नृत्यदिग्दर्शकाच्या नव्या पिढीतील मानसी अग्रवाल हिची सध्या चांगलीच चर्चा सुरू आहे. तिने ‘वजनदार’ या मराठी चित्रपटातील पार्टी साँगची कोरिओग्राफी केली आहे. या निमित्ताने तिने ‘सीएनएक्स’शी संवाद साधला. डान्स कोरिओग्रॉफ करताना मी स्वत:च अ‍ॅक्टर असते, असे ती म्हणाली.
प्रश्न : ‘दिल्ली ते बॉलिवूड’ हा प्रवास कसा सुरू झाला?
मानसी : मी लहानपणापासूनच कथक शिकत होते. यानंतर आठ वर्षे मी कथक शिकवित होते. आमच्या कॉलेजमध्ये एक डान्स शो आयोजित करण्यात आला होता. तेथे अनुराग कश्यप आले होते. त्यांनी माझा या शोमधील डान्स पाहिला आणि मला ‘गुलाल’ या चित्रपटासाठी कोरिओग्राफी करण्याची आॅफर दिली. संधी माझ्याकडे चालून येत होती तिला सोडण्याचा प्रश्नच नव्हता.

प्रश्न : ‘सुनो ना संगेमरमर’ या गाण्यामुळे तुला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. ताजमहल मागे असताना गाण्याचे दिग्दर्शन करणे हा कसा अनुभव होता?
मानसी : ताजमहल अत्यंत सुंदर आहे, तुम्ही दिवसभर नुसते उभे राहून त्याला पाहू शकता. सुनो ना संगेमरमर या गाण्यात डान्सही नव्हता, ते गाणेच दिग्दर्शित करायचे होते. शब्द व भावनांचा मेळ मला कलाकारांच्या वागण्यातून दाखवायचा होता. यामुळे तेथे कोरिओग्राफरची गरज होती. हे माझे पहिले रोमाँटिक गाणे होते. मी जेव्हा पहिल्यांदा तिथे गेले तेव्हा मी येथे गाणे शूट करणार आहे हेच विसरले होते. ताजमहलचे सौंदर्य तुम्हाला आपल्या विश्वाची निर्मिती करायला लावणारे आहे.
प्रश्न : हिंदी चित्रपटात काम करताना अचानक मराठी चित्रपटात कशी काय आलीस?
मानसी : सचिन कुंडलकरसोबत मी यापूर्वी ‘अय्या’ या चित्रपटात काम केले होते. त्याने मला ‘वजनदार’बद्दल विचारले. मी यापूर्वी कधीच मराठीत काम केले नव्हते, पण सचिनने मला सांगितले की हे पार्टी साँग आहे. हिंदी, इंग्रजी व मराठी या तिन्ही भाषा त्यात आहे, यामुळे मी त्याला होकार दिला. सई व प्रियासोबत काम करताना मजा आली. दोघीही आपल्या कामाप्रती सिन्सिअर आहेत. आम्ही जे गाणे करणार होतो, त्यात दोघीही आपली बंधने तोडून आल्या आहेत. त्यांच्या मनात कुणाची भीती नाही. त्या एन्जॉय करीत असल्याचे दाखवायचे होते. अनेक मुली आपले जीवन जगू इच्छितात. त्यांना कॅप्चर करणे माझ्यासाठी नवे होते. या गाण्यात मला फार मजा आली. हे गाणे खास आहेच ते तुम्ही पाहिल्यावर कळेलच.
प्रश्न : महाराष्ट्रातील लावणी, तमाशा याबद्दल तुला काय वाटते?
मानसी : महाराष्ट्रात लावणी व तमाशाबद्दल फार उत्सुकता असते, तमाशा आता कमी झालाय. पण, लावणी कायम असल्याचे दिसते. जेव्हा मी स्टेज करीत होते. तेव्हा अनेकदा लावणी केली आहे. रंगतदार गाणे म्हणजे लावणी, पण आता लावणी त्याच्या मूळ रूपापासून थोडी बाजूला झाली आहे असे वाटू लागलेय. आजही लावणीला जर मूळ रूपात दाखविण्याचा प्रयत्न केला, तर नक्कीच त्याची पुन्हा प्रशंसा होईल.

प्रश्न : सध्या टीव्हीवर अनेक डान्स रिअ‍ॅलिटी शो सुरू आहेत. अनेक डान्सर यात चांगले नृत्य करताना दिसतात; मात्र ते आपले स्थान निर्माण करू शकत नाही, असे का होत असावे?
मानसी : डान्स रिअ‍ॅलिटी शोमधील स्पर्धकांचा फोकस डान्सच्या शारीरिक हालचालींवर दिसतो. डान्स केवळ शारीरिक नाही. त्यात ‘हार्ट अँड सोल’ या दोन्ही गोष्टी असायला हव्या. डान्स मनातून यायला हवा. तरच त्याच्या डान्सला लोक पसंत करतील. ते यशस्वी होतील. पार्टी साँग असो किंवा रोमँटिक गाणे असो मी त्याला अनुभवण्यावर विश्वास ठेवते. डान्स करताना मी अ‍ॅक्टर काय विचार करेल हे मनात आणते, किंबहुना मी त्यावेळी अ‍ॅक्टरच असते.

Web Title: I am the master of dance while choreography ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.