"मला नाही वाटत आपण एकत्र काम करू शकतो..", भन्साळींनी फरदीन खानला केलं होतं रिजेक्ट, हे होतं कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 12:40 PM2024-04-27T12:40:19+5:302024-04-27T12:40:57+5:30
Fardeen Khan : अभिनेता फरदीन खानने खुलासा केला की, संजय लीला भन्साळी यांनी त्याला एकदा रिजेक्ट केले होते. २००० साली त्यांनी अभिनेत्यासोबत काम करण्यास नकार दिला होता.
अभिनेता फरदीन खान (Fardeen Khan) जवळपास १२ वर्षांनंतर संजय लीला भन्साळी (Sanjay Leela Bhansali) यांची वेबसीरिज 'हीरामंडी'(Heeramandi Web Series)मधून अभिनय क्षेत्रात कमबॅक करत आहे. या सीरिजमध्ये तो वली मोहम्मदच्या प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. हीरामंडीच्या ट्रेलरमध्ये फरदीन खानचे खूप कौतुक झाले आणि त्याला सीरिजमध्ये पाहण्यासाठी उत्सुक आहे. फरदीनदेखील संजय लीला भन्साली सारख्या दिग्दर्शकासोबत काम करण्यासाठी खूप उत्सुक आहे. मात्र भन्साळींनी एकेकाळी अभिनेत्यासोबत काम करण्यासाठी नकार दिला होता. ही २००० सालची गोष्ट आहे. हा किस्सा फरदीनने सांगितला आहे.
फरदीन खानने 'पिंकविला'ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, जेव्हा तो २००० साली संजय लीला भन्साळी यांच्याकडे काम मागायला गेला होता तेव्हा दिग्दर्शकाने नकार दिला होता आणि अभिनेत्यामध्ये पॅशनची कमतरता असल्याचे सांगितले होते. पण जेव्हा फरदीनला सांगण्यात आले की संजय लीला भन्साळी यांनी २००५ मध्ये 'ब्लॅक'मध्ये त्याच्यासाठी एक छोटी भूमिका लिहिली होती, तेव्हा अभिनेता आश्चर्यचकित झाला. मात्र, काही कारणास्तव सिनेमात काम करू शकला नाही.
या कारणामुळे फरदीन खानला नकार दिला होता
याबाबत फरदीन खान म्हणाला, 'माझ्यासाठी ही बातमी आहे. यावर काय बोलावे ते कळत नाही. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, जी मी संजय सरांना वली मोहम्मदच्या भूमिकेसाठी नुकतेच भेटायला गेलो होतो तेव्हा त्या गोष्टीची आठवण करून दिली होती. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो. मला त्यांच्यासोबत काम करायचे होते आणि याच शोधात मी तिकडे गेलो होतो. ते मला भेटले आणि आम्ही १०-१५ मिनिटे बसलो आणि बोललो. मग तो मला म्हणाला, फरदीन, मला वाटत नाही की आपण एकत्र काम करू शकतो कारण मला तुझ्या डोळ्यात फायर दिसत नाही.
फरदीनला वाटलं खूप वाईट
फरदीन खान पुढे म्हणाला, 'त्यावेळी हे खूप क्रूर वाटत होते आणि यावेळी मी त्यांना सांगितले की, त्या वेळी ते क्रूर वाटत असले तरी मला तेच ऐकायचे होते. त्याऐवजी, माझे ऐकणे आवश्यक होते. याबद्दल मी त्यांचे आभार मानले. मला 'ब्लॅक' चित्रपटात कास्ट करण्याच्या त्यांच्या इच्छेबद्दल त्यांनी मला कधीच सांगितले नाही. हे मी पहिल्यांदाच ऐकत आहे. पण त्यांच्यासारख्या मास्टरसोबत काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल मी खूप आभारी आहे. हा एक आश्चर्यकारक शिकण्याचा अनुभव आहे.
फरदीनला अशी मिळाली 'हिरामंडी'मध्ये भूमिका
दुसऱ्या एका मुलाखतीत फरदीन खानने सांगितले की, त्याला 'हीरामंडी'मध्ये कोणतीही ऑडिशन न घेता भूमिका मिळाली. फरदीनने सांगितले की तो एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी गेला होता, जिथे कास्टिंग डायरेक्टर श्रुती महाजनने त्याला पाहिले आणि वाटले की वलीच्या भूमिकेसाठी तो योग्य आहे. त्यानंतर त्यांनी अभिनेत्याला संजय लीला भन्साळी आणि त्यांच्या टीमला भेटण्यास सांगितले. फरदीन खान जेव्हा संजय लीला भन्साळींना भेटायला आला तेव्हा त्यांनी अभिनेत्याकडे एक कटाक्ष टाकला कारण तो त्याला यापूर्वीही भेटला होता आणि मग निघून गेला. नंतर फरदीन खानची लूक टेस्ट झाली आणि त्याला ही भूमिका मिळाली. 'हिरामंडी' १ मे रोजी ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होईल. यात मनीषा कोईराला, सोनाक्षी सिन्हा, शर्मिन सहगल, अदिती राव हैदरी, संजीदा शेख आणि रिचा चड्ढा यांच्याही भूमिका आहेत.