'राज ठाकरेंमुळे मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका', खुद्द अक्षय कुमारचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 01:23 PM2022-11-03T13:23:13+5:302022-11-03T13:24:16+5:30

महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांनी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat).

'I got the role of Chhatrapati Shivaji Maharaj because of Raj Thackeray', reveals Akshay Kumar himself | 'राज ठाकरेंमुळे मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका', खुद्द अक्षय कुमारचा खुलासा

'राज ठाकरेंमुळे मिळाली छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका', खुद्द अक्षय कुमारचा खुलासा

googlenewsNext

मराठी आणि हिंदी सिनेइंडस्ट्रीतले प्रसिद्ध दिग्दर्शक आणि अभिनेता महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar ) यांनी एका ऐतिहासिक चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे नाव आहे ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ (Vedat Marathe Veer Daudale Saat). नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या उपस्थितीत या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या महेश मांजरेकरांच्या आत्तापर्यंतच्या सर्वात मोठ्या चित्रपटात अक्षय कुमार (Akshay Kumar) छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. यावेळी त्याचा चित्रपटातील लूकही दाखवण्यात आला. दरम्यान अक्षय कुमारला ही भूमिका राज ठाकरे यांच्यामुळे मिळाल्याचा खुलासा त्याने यावेळी केला. 

‘वेडात मराठे वीर दौडले सात’ चित्रपटात अक्षय कुमार शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारतो आहे आणि तेही मराठी चित्रपटात. हे समजल्यावर त्याचे चाहते आणि मराठी रसिक खूप खूश झाले आहेत. या चित्रपटाच्या इव्हेंटमध्ये अक्षय कुमारने मराठीत संवाद साधून सर्वांना चकीत केले.  मंचावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाहून अक्षय कुमार म्हणाला की, मी तुम्हाला पहिल्यांदाच भेटतो आहे. खूप आनंद झाला तुम्हाला भेटून.


या भूमिकेबद्दल अभिनेता म्हणाला की, मला ही भूमिका राज ठाकरे यांच्यामुळे मिळाली. त्यांनी मला ही भूमिका तू केली पाहिजे असे म्हटले आणि मी तयारही झालो. मला छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका करायला मिळते आहे, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. माझ्यासाठी ही भूमिका आव्हानात्मक आहे. पण यासाठी मी कठोर परिश्रम करेन. 
पुढे अक्षय कुमार म्हणाला की, महेश मांजरेकरांसोबत मी पहिल्यांदाच काम करणार आहे. त्यामुळे मी खूप उत्सुक आहे. त्यावर महेश मांजरेकर म्हणाले की, अक्षय कुमारांसोबत काम करायची माझी इच्छा होती आणि या भूमिकेसाठी मला दुसरा कोणी अभिनेता दिसला नाही. कारण या भूमिकेसाठी एक व्यक्तिमत्त्व, लूक हवा होता. त्यासाठी अक्षय कुमार योग्य वाटला.

Web Title: 'I got the role of Chhatrapati Shivaji Maharaj because of Raj Thackeray', reveals Akshay Kumar himself

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.