मेरे साई या मालिकेसाठी हिंदी भाषेवर खूप मेहनत घेतलीः वैभव मांगले

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2017 10:26 AM2017-10-05T10:26:17+5:302017-10-05T16:00:16+5:30

फू बाई फू या कार्यक्रमामुळे वैभव मांगले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्याने टाइमपास, काकस्पर्श, हरिश्चंद्राची फॅक्टरी यांसारख्या चित्रपटांमध्ये ...

I have worked hard on the Hindi language for my Sai series: Vaibhav Negte | मेरे साई या मालिकेसाठी हिंदी भाषेवर खूप मेहनत घेतलीः वैभव मांगले

मेरे साई या मालिकेसाठी हिंदी भाषेवर खूप मेहनत घेतलीः वैभव मांगले

googlenewsNext
बाई फू या कार्यक्रमामुळे वैभव मांगले हे नाव महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचले. त्याने टाइमपास, काकस्पर्श, हरिश्चंद्राची फॅक्टरी यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. मराठी चित्रपटसृष्टीत आपले नाव कमवल्यानंतर तो आता हिंदी मालिकेकडे वळला आहे. मेरे साई या मालिकेत तो प्रेक्षकांना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्या आजवरच्या कारकिर्दीविषयी आणि त्याच्या या नव्या इनिंगविषयी त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

मराठी चित्रपटसृष्टीत काम करत असताना हिंदीकडे वळण्याचे कसे ठरवले?
आज मराठीत मी खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आज एक विनोदवीर अशी माझी मराठीत ओळख निर्माण झाली आहे. मराठीत काम करत असताना हिंदीत देखील काम करावे असे मला वाटत होते. त्यामुळे मी चांगल्या भूमिकांच्या शोधात होतो. मराठीत काम करत असताना मराठी लोकच तुम्हाला ओळखतात. पण हिंदीत काम करताना भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातील लोकांचे प्रेम तुम्हाला मिळते. 

मेरे साई या मालिकेचा तुझा प्रवास कसा सुरू झाला?
मेरे साई या मालिकेचे निर्माते नितीन वैद्य यांना मी एकदा सहजच मला हिंदीत काम करायचे असे बोललो होतो आणि त्यानंतर केवळ दोन दिवसांत त्यांनी मला फोन केला आणि भेटायला बोलावले. आम्ही मेरे साई अशी साईबाबांच्या आयुष्यावर एक मालिका करत असून या मालिकेत कुलकर्णीची भूमिका तू साकारशील का असे त्यांनी मला विचारले. मी क्षणातच या मालिकेसाठी त्यांना होकार दिला. त्यांनी काकस्पर्श या चित्रपटातील माझी भूमिका पाहिली होती. या चित्रपटातील उपाध्याय हा काहीसा कर्मंट दाखवण्यात आला होता. या चित्रपटातील काही दृश्य त्यांनी सोनी वाहिनीच्या प्रतिनिधींना दाखवून हा अभिनेता आपल्या मालिकेतील कुलकर्णी या पात्रासाठी योग्य असल्याचे सांगितले आणि या मंडळींनी देखील दृश्य पाहाताच क्षणी मीच या भूमिकेसाठी योग्य असल्याचे जाणवले. त्यामुळे कोणतेही ऑडिशन न देता मी या मालिकेचा भाग बनलो. 

हिंदीत काम करताना तुला काय फरक जाणवला?
भाषा सोडली तर हिंदी आणि मराठीत काम करणे काही वेगळे आहे असे मला वाटत नाही. हिंदीत काम करण्यासाठी मी सगळ्यात जास्त भाषेवर मेहनत घेतली. मराठी लोकांचा हिंदी भाषा बोलताना एक ठरावीक टोन असतो. माझ्या बोलण्यात तो टोन जाणवू नये यासाठी मी हिंदी भाषेतील अनेक कांदबऱ्या वाचल्या. या कांदबऱ्या वाचत असताना मी मोठ्याने बोलत असे. त्यामुळे माझी हिंदी आता बऱ्यापैकी सुधारली आहे. 

मालिकेचे चित्रीकरण सुरू होऊन आता काही दिवस झाले आहेत. मालिकेच्या टीमसोबत कसे ट्युनिंग जमून आले आहे?
मी मराठीत रंगभूमीवर अनेक वर्षं काम केले आहे तर या मालिकेतील अनेक कलाकार देखील नाटकातूनच आलेले आहे. आम्ही सगळेच रंगभूमीवरून असल्याने आमचे ट्युनिंग खूप छान जमले आहे. आमच्यात गिव्ह अँड टेक चांगले होत असल्याने आमचा परफॉर्मन्स खूप चांगल्या प्रकारे खुलून येत आहे. 

Also Read : शर्मिला राजाराम सांगतेय हिंदी मालिकेत काम करतेय असे वाटतच नाहीये

Web Title: I have worked hard on the Hindi language for my Sai series: Vaibhav Negte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.