धूम्रपानामुळे मी वडिलांना गमावले!
By Admin | Published: February 26, 2016 03:28 AM2016-02-26T03:28:28+5:302016-02-26T03:28:28+5:30
धूम्रपान हे आरोग्यास घातक आहे. माझ्या वडिलांचा यामुळेच मृत्यू झाला. तरुण पिढीने या व्यसनापासून दूरच राहायला हवे, सिगारेटला स्पर्शही करणार नाही, अशी शपथ त्यांनी घ्यायला
धूम्रपान हे आरोग्यास घातक आहे. माझ्या वडिलांचा यामुळेच मृत्यू झाला. तरुण पिढीने या व्यसनापासून दूरच राहायला हवे, सिगारेटला स्पर्शही करणार नाही, अशी शपथ त्यांनी घ्यायला हवी, असे आवाहन सनी लिओनने केले आहे. तुमच्या मनात धूम्रपानाचा थोडाही विचार आला तर आधी कुटुंबाचा विचार करा, असा संदेश सनीने दिला आहे. सध्या ती व्यसनविरोधी मोहिमेच्या माध्यमातून जागृती करीत आहे. ‘११ मिनिट्स’ या लघुपटात तिचाही सहभाग आहे. एकट्याच्या बळावर प्रेक्षकांना चित्रपटगृहात खेचणाऱ्या मोजक्या काही अभिनेत्रींमध्ये सनी लिओनचा समावेश होतो. याशिवाय समाजातील विशिष्ट घटकांसाठीही ती मदतीचा हात पुढे करीत असते. ‘११ मिनिट्स’मध्ये दीपक डोबरियाल आणि आलोक नाथ यांचाही सहभाग आहे. दीपक डोबरियाल हा अंतिम घटका मोजत आहे आणि त्याचे वडील आलोक नाथ हे त्याची शेवटची इच्छा पूर्ण करण्यासाठी धडपड करतात. शेवटची इच्छा काय असते तर सनी लिओनची भेट. आलोक नाथ हे केवळ मुलाच्या प्रेमापोटी सनी लिओनला गावात घेऊन येतात.