पलक तिवारीला डेट करतोय का? इब्राहिम अली खानने पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2025 17:28 IST2025-04-15T17:28:04+5:302025-04-15T17:28:59+5:30
पलक तिवारीबद्दल इब्राहिमची पहिल्यांदाच प्रतिक्रिया

पलक तिवारीला डेट करतोय का? इब्राहिम अली खानने पहिल्यांदाच दिलं उत्तर, म्हणाला...
सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खानने (Ibrahim Ali Khan) 'नादानियां' सिनेमातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. त्याचा हा सिनेमा चांगलाच आपटला मात्र त्याच्या हँडसम लूक्सवर सगळे फिदा झाले. पदार्पणाआधीपासूनच इब्राहिम चर्चेत होता. पलक तिवारीसोबत त्याचं अफेअर प्रचंड गाजलं. दोघं मालदीवला सुट्टीही एन्जॉय करुन आले. दरम्यान इब्राहिमने पहिल्यांदाच पलकसोबतच्या डेटिंगच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.
इब्राहिम अली खान आणि श्वेता तिवारीची लेक पलक तिवारी दोघांची सोशल मीडियावर कायम चर्चा असते. पलकच्या एका फोटोत तर ती पतौडी पॅलेसमध्ये होती असाही नेटकऱ्यांनी अंदाज लावला होता. शिवाय पलक इब्राहिम आणि त्याची आई अमृता सिंह, बहीण सारासोबत गोवा ट्रीपवरही जाऊन आली. दोघांचं अफेअर कोणापासूनच लपलं नाही. नुकतंच फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत इब्राहिम अली खानने यावर अगदी थोडक्यात उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, "हो ती खूप गोड मुलगी आहे, क्युट आहे. पण इतकंच...ती चांगली मैत्रीण आहे."
इब्राहिम लवकरच 'सरजमीन' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये तो काजोल आणि साऊथ सुपरस्टार पृथ्वीराज सुकुमारनसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. पहिला सिनेमा आपटल्यानंतर इब्राहिमला दुसऱ्या सिनेमाकडून अपेक्षा आहेत. तर दुसरीकडे पलक तिवारी आगामी 'भूतनी' सिनेमात दिसणार आहे. यामध्ये संजय दत्त, मौनी रॉय यांची भूमिका आहे.