Amitabh-Rekha Affair: जयपूरमध्ये 'ती' घटना घडली नसती तर अमिताभ-रेखाचं अफेअर कधीच जगापुढे आलं नसतं...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2023 08:00 AM2023-03-01T08:00:00+5:302023-03-01T08:00:02+5:30

Amitabh Bachchan & Rekha Lovestory: बॉलिवूडचं सर्वाधिक गाजलेलं आणि आज इतक्या वषार्नंतरही चर्चेत राहणार प्रेमप्रकरण कोणतं? तर अमिताभ बच्चन व रेखा यांचं...

if amitabh bachchan have not beaten that man his affair with rekha will be secret always | Amitabh-Rekha Affair: जयपूरमध्ये 'ती' घटना घडली नसती तर अमिताभ-रेखाचं अफेअर कधीच जगापुढे आलं नसतं...!!

Amitabh-Rekha Affair: जयपूरमध्ये 'ती' घटना घडली नसती तर अमिताभ-रेखाचं अफेअर कधीच जगापुढे आलं नसतं...!!

googlenewsNext

Amitabh Bachchan & Rekha Lovestory: बॉलिवूडचं सर्वाधिक गाजलेलं आणि आज इतक्या वषार्नंतरही चर्चेत राहणार प्रेमप्रकरण कोणतं? तर अमिताभ बच्चनरेखा यांचं. होय, एकेकाळी या अफेअरची प्रचंड चर्चा झाली आणि आजही होते. अमिताभ व रेखा कधीच आपल्या प्रेमप्रकरणावर बोलले नाहीत. पण याऊपरही रेखा व अमिताभ या जोडीचे किस्से चवीनं चघळले गेलेत. आजही चघळले जातात. असं म्हणतात की, रेखा अमिताभ यांच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. आजही ती त्यांच्यावर प्रेम करते. या प्रेमाची भणक लोकांना कशी लागली, तर यामागे एक किस्सा आहे. होय, जयपूरच्या एका घटनेनंतर या अफेअरची कुणकुण सर्वांना लागली होती. जयपुरात ती घटना घडली नसती तर कदाचित या अफेअरची चर्चाच झाली नसती...

या किस्स्याचा उल्लेख रेखाचं आत्मचरित्र 'रेखा-द अनटोल्ड स्टोरी'मध्ये करण्यात आला आहे. यासीर उस्मान लिखित या पुस्तकात तेव्हाचा हा किस्सा सांगितला आहे. तर अमिताभ व रेखा गंगा की सौगंध या सिनेमाचं शूट करत होते. जयपूरमध्ये शूटींग सुरू होतं. शूटींग म्हटल्यावर गर्दी होणारच. त्यातही अमिताभ व रेखाच्या सिनेमाचं शूटींग म्हटल्यावर लोकांची झुंबड उडाली. अमिताभ-रेखाला पहायला मोठ्या संख्येनं लोक जमले होते. यादरम्यानं गर्दीत घुसलेल्या एका व्यक्तीनं रेखावर खूप घाणेरड्या कमेंट्स करायला सुरूवात केली. त्याला समजवण्याचा बराच प्रयत्न केला गेला. शूटींग युनिटनं अनेकदा त्याला तंबीही दिली. पण तो मानेना. अखेर अमिताभ बच्चन यांना संयम संपला. त्याचा पारा चढला. रेखावर अश्लिल कमेंट्स करणाऱ्या त्या माणसाला अमिताभने चांगलाच चोप दिला. खरं तर तो माणूस आणि ते प्रकरण तिथे जयपूरमध्येच मिटलं होतं. पण यानंतर इथून वेगळीच चर्चा सुरू झाली. अमिताभच्या मनात रेखाबद्दल काहीतरी खास आहे, म्हणूनच त्याने त्या माणसाची धुलाई केली, अशा बातम्या पसरल्या. रेखाबद्दल अमिताभ पझेसिव्ह आहे, हे या घटनेनंतर पहिल्यांदा समोर आलं. झालं...! इथूनच दोघांच्या अफेअरच्या चर्चा सुरू झाल्या.

पुढची सगळी स्टोरी तुम्हाला ठाऊक आहेच. रेखासोबतच्या अफेअरमुळे जया व अमिताभ यांच्या वैवाहिक आयुष्यात खटके उडायला सुरूवात झाली. मीडिया रिपोर्टनुसार, याचदरम्यान रेखासोबत पुन्हा कधीच काम करणार नाही, अशी शपथ अमिताभ यांनी घेतली. त्यामुळेच १९८१ साली आलेल्या सिलसिला नंतर दोघांनीही एकत्र काम केलं नाही.

Web Title: if amitabh bachchan have not beaten that man his affair with rekha will be secret always

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.