Kajol, Shah Rukh Khan: आर्यनने नीसाला पळवून नेलं तर? काजोलनं दिलेलं भन्नाट उत्तर, शाहरूखची झालेली बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2023 03:40 PM2023-04-21T15:40:28+5:302023-04-21T15:41:41+5:30

Kajol, Shah Rukh Khan: काजोलच्या लेकीला म्हणजे नीसाला शाहरूखच्या लेकाने म्हणजेच आर्यनने पळवून नेलं तर? तुम्ही आम्ही कधीच हा विचार केलेला नसेल. पण करण जोहरच्या मनात खूप वर्षांआधीच असा प्रश्न आला होता.

if aryan khan elopes with nysa devgan? shah rukh khan scared about kajol answer | Kajol, Shah Rukh Khan: आर्यनने नीसाला पळवून नेलं तर? काजोलनं दिलेलं भन्नाट उत्तर, शाहरूखची झालेली बोलती बंद

Kajol, Shah Rukh Khan: आर्यनने नीसाला पळवून नेलं तर? काजोलनं दिलेलं भन्नाट उत्तर, शाहरूखची झालेली बोलती बंद

googlenewsNext

काजोल (Kajol ) आणि शाहरुख खान (Shah Rukh Khan) हिंदी सिनेमातील पडद्यावरचं लोकप्रिय कपल. दोघांचीही जोडी पडद्यावर एकत्र आली आणि या जोडीने सर्वांना अक्षरश: वेड लावलं. भविष्याच याच काजोलच्या लेकीला म्हणजे नीसाला (Nysa Devgan) शाहरूखच्या लेकाने म्हणजेच आर्यनने (Aryan Khan) पळवून नेलं तर? तुम्ही आम्ही कधीच हा विचार केलेला नसेल. पण करण जोहरच्या मनात खूप वर्षांआधीच असा प्रश्न आला. मग काय? त्याने थेट काजोललाच हा प्रश्न केला. होय, 'कॉफी विद करण'च्या एका एपिसोडमध्ये त्याने थेट शाहरूखसमोरच काजोलला हा प्रश्न केला होता. 

२००७ साली 'कॉफी विद करण'च्या (Koffee With Karan) एका एपिसोडमध्ये  'कुछ कुछ होता है' स्टार्स काजोल, शाहरूख व राणी मुखर्जी सहभागी झाले होते. रॅपिड फायर राऊंड दरम्यान करण जोहरनंआर्यन खान आणि नीसा देवगणशी संबंधित एक प्रश्न काजोलला विचारला होता. यावर काजोलने खूपच मजेशीर उत्तर दिलं होतं.

रॅपिड फायर राऊंड होता त्यामुळे करणने प्रश्न केला अन् काजोलने क्षणाचाही अवकाश न करता झटपट उत्तर दिलं होतं. आणखी मजेदार म्हणजे, काजोलचं उत्तर ऐकून शाहरूखला हसू आपरलं नव्हतं.  त्याच्याजवळ या प्रश्नाचं काही उत्तरच नव्हतं. पण काजोलच्या उत्तराने तो हैराण झाला होता.

१० वर्षानंतर आर्यन खान नीसाला घेऊन पळून गेलाच आणि तुला हे कळलं तर तुझी काय रिॲक्शन असेल? असा प्रश्न करणने काजोलला केला होता. यावर  मी तर म्हणेन की दिलवाले दूल्हे ले जायेंगे..., असं उत्तर काजोलने दिलं होतं. काजोलच्या या उत्तरावर शाहरूखला हसू आवरलं नव्हतं. यानंतरचा शाहरूख जे काही बोलला ते तर धम्माल होतं.  काजोलसोबत नातं जोडायचं, मी तर हा विचार करूनच घाबरलो आहे, असं शाहरूख म्हणाला होता.  शाहरुखचं हे बोलणं ऐकून काजोल,रानी एवढंच नाही तर करण जोहर खळखळून हसू लागले होते.
 

Web Title: if aryan khan elopes with nysa devgan? shah rukh khan scared about kajol answer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.