"देवाला सोडत नाहीत तर मी कोण?", घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांना ए.आर. रहमान यांचं प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 17:07 IST2025-04-24T17:07:20+5:302025-04-24T17:07:44+5:30

A.R. Rahman : ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान पत्नी सायरा बानो यांच्यासोबत घेतलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आले होते. आता गायकाने एका मुलाखतीत खासगी आयुष्यासंदर्भातील अफवांवर मौन सोडले आहे.

"If I don't leave God, who am I?", A.R. Rahman's reply to those trolling him over his divorce | "देवाला सोडत नाहीत तर मी कोण?", घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांना ए.आर. रहमान यांचं प्रत्युत्तर

"देवाला सोडत नाहीत तर मी कोण?", घटस्फोटावरून ट्रोल करणाऱ्यांना ए.आर. रहमान यांचं प्रत्युत्तर

ऑस्कर विजेते संगीतकार ए आर रहमान (A.R. Rahman) सध्या म्युझिक कॉन्सर्ट वंडरमेंटच्या तयारीत व्यग्र आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या खासगी आयुष्यात आलेल्या चढउतारामुळे त्रस्त होते. ते पत्नी सायरा बानो यांच्यासोबत घेतलेल्या घटस्फोटामुळे चर्चेत आले होते. आता गायकाने एका मुलाखतीत खासगी आयुष्यासंदर्भातील अफवांवर मौन सोडले आहे.

सायरा बानो आणि ए.आर. रहमान या  जोडप्याच्या विभक्त होत असल्याच्या निर्णयामुळे चाहत्यांना धक्का बसला. त्यांच्या घटस्फोटाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. मात्र नोव्हेंबर, २०२४ रोजी त्यांनी जाहीररित्या वेगळे होत असल्याचे सांगितले. त्यानंतर संगीतकार ट्रोलर्सच्या निशाण्यावर आले होते. मात्र त्यांनी बराच काळ यावर मौन बाळगले होते. आता, युट्यूबवर नयनदीप रक्षित यांच्याशी झालेल्या मुलाखतीत, ए.आर. रहमान म्हणाले की सार्वजनिक जीवनात प्रवेश करण्याचा निर्णय जाणीवपूर्वक घेतला आहे, म्हणून प्रत्येकाची समीक्षा केली जाते. सर्वात श्रीमंत व्यक्तीपासून ते देवापर्यंत सर्वांची समीक्षा केली जाते, मग मी कोण आहे?

ट्रोलर्संनाही मानलं कुटुंब 
जोपर्यंत आपण एकमेकांशी जुळवून घेतो आणि गर्विष्ठ किंवा विषारी नसतो. एवढंच नाही तर जे आपल्यावर टीका करतात ते देखील एक कुटुंब आहेत. जर मी एखाद्याच्या कुटुंबाबद्दल काही बोललो तर कोणीतरी माझ्याबद्दल काहीतरी बोलेल आणि आपण भारतीय असल्याच्या नात्याने यावर विश्वास ठेवतो. कोणीही अनावश्यक गोष्टी बोलू नयेत, कारण प्रत्येकाला एक बहीण, एक पत्नी, एक आई असते. जेव्हा कोणी काही दुखावणारे बोलते तेव्हा मी प्रार्थना करतो, 'हे देवा, त्यांना क्षमा कर आणि त्यांना मार्गदर्शन कर.

नोव्हेंबर २०२४ मध्ये वेगळे होण्याची केली घोषणा
नोव्हेंबर २०२४ मध्ये, ए.आर.रहमान यांनी X अकाउंटवर पत्नीपासून विभक्त होत असल्याचे सांगितले. ते म्हणाले, आम्ही सहजीवनाची ३० वर्षे पूर्ण करू अशी आम्हाला आशा होती. पण प्रत्येक गोष्टीचा एक अप्रत्यक्ष अंत असतो. एखादी गोष्ट विखुरली तर ती पुन्हा जोडली जाऊ शकत नाही. एकदा विखुरलेले तुकडे पुन्हा जोडले तरीही त्यांची जागा कोणीच घेऊ शकत नाही.या कठीण काळात आमच्या प्रायव्हसीचा आदर करा. आयुष्याच्या या नाजूक टप्प्यावर आम्हाला साथ दिल्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. ए. आर. रहमान आणि सायरा बानो यांनी १२ मार्च, १९९५ मध्ये चेन्नईत लग्न केले होते. त्यांना खतीजा, रहीमा आणि अमीन ही तीन मुले आहेत.

Web Title: "If I don't leave God, who am I?", A.R. Rahman's reply to those trolling him over his divorce

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.